भद्रावती शहरात मन हेलावनारी घटना.....१ दिवसाच्या जिवंत अर्भक फेकले रसत्याच्या कडेला...
माॅर्नींग वाॅकला जानार्यां मुळे घटना आली उघळकीस....भद्रावती ग्रामीन रुग्नालयात उपचार सुरु......
जिवंत अर्भक फेकुन देणार्या त्या निर्दयी मातेचा शोध सुरु....
अर्भकाला हाताला १२ तर पायाला ही १२ बोटे.....
विदर्भ माझा न्युज 24 - भद्रावती
भद्रावती शहरात हृदय हेलावनारी घटना उघडकीस आली आहे. भद्रावती शहरातील जैन मंदिर परिसराच्या मागील बाजूस रसत्याच्या कडेला चंडिका माता परिसरात एक दिवसाचे नवजात अर्भक ठेवल्याचे आढळून आल्याने चांगलीच खडबड उडाली आहे.
सदर घटना मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हा नवजात शिशू मुलगा असून त्याच्या हाताला १२ आणि पायाला १२ असे एकूण २४ बोटे आहेत.
शहरातील चंडिका माता परिसरातील गॅरेज मालक देवानंद हिवरकर यांना सकाळी ७ वाजताच्या सुमारास
माहिती मिळताच पोलिसांनी त्या नवजात अर्भकाला ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून त्या मातेचा शोध सुरू केला आहे. शहरातील चंडिका माता परिसरातील गॅरेज मालक देवानंद हिवरकर यांना सकाळी ४ ते ७ वाजताच्या सुमारास माॅरनींग वाॅक ला गेले अस्ता त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी त्या दिशेने जाऊन बघितले असता कापडात जिवंत नवजात शिशू असल्याचे दिसून आले.सदर घटनेची माहीती सोबत असलेला मीत्र सौरभ गोठेकर व जयश्री गोठेकर यांना दिली व त्यांच्या मदतीने पोलिसांना माहीती दीली,दरम्यान, नागरिकांनी घटनास्थळावर प्रचंड गर्दी केली.
देवानंद हिवरकर,सौरभ गोठेकर व जयश्री गोठेकर यांनी त्या बेवारस स्थीती आठळलेल्या जिवंत अर्भकास घेऊन पुढील उपचारा साठी ग्रामीन रुग्नालय भद्रावती येथी दाखल केले.
काही वेळातच पोलीस उपनिरीक्षक अमोल कोल्हे आणि पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपानी हे ग्रामीन रुग्नालयात दाखल झाले. पाहणी केली असता नवजात शिशूच्या अंगाला मुंग्या लागल्या होत्या. भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्याला दूध पाजण्यात आले.
जिवंत अर्भकाला या स्थितीत सोडणारी ती निर्दयी माता कोण, याचा शोध घेण्यासाठी रुग्णालय तसेच परिसरातील माहिती गोळा करणे सुरू केले आहे. घटनेचा अधीक तपास भद्रवती पोलीस करीत आहे.
