Pos मशीन सुरळीत चालू करण्यात यावी...विठ्ठल पाल सरकारी स्वस्त धान्य दुकानदार निंबाला यांचे राजुरा तहसीलदार यांना निवेदन........
विदर्भ माझा न्यूज 24 - राजुरा
राजुरा तालुक्यातिल निंबाळा येथील विठ्ठल हरी पाल यांनी तहसीलदार राजुरा यांना निवेदना मार्फत pos मशीन सुरळीत चालू करण्याची मागणी केली आहे.मागील काही महिन्यापासून अन्य धान्य वाटप करण्याची pos मशीन नीट काम करित नसून खूप मोठ्या अडचणी येत आहे.सरकारी स्वस्त धान्य दुकानदार यांना अडचण येतात.कार्ड धारकाच्या शिवीगाळ आयकांवी लागत आहे. Pos मशिन असेच चालत राहिले तर कार्ड धारक मारहाण करायला मागे येणार नाही. रास्तदुकानदार् यांना तारखेच्या आत धान्य मिळत नाही.मशीन मधून तारीख गेल्या नंतर धान्य मिळत असते.त्यामुळे नियमित वाटप कसे करायचे आणी pos मशीन काम करित नसते.
म्हणून विठ्ठल हरी पाल यांनी तहसीलदार यांच्याकडे pos मशीन सुरळीत चालू करण्यासाठी निवेदन देऊन लवकरात लवकर चालू करण्यात यावी अशी विनंती केली आहे .

