Top News

Forest Minister Mungantiwar expressed satisfaction that the encroachment near the grave was removed on Shiv Pratap Day.

शिवप्रताप दिनी कबरीजवळील अतिक्रमण काढल्याचे वनमंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केले समाधान......


अफजलखानाच्या विचारांचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार




विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)

स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू असलेल्या अफजलखानाची कबर  , त्याजवळ झालेले अतिक्रमण व  त्या माध्यमातून    अफजलखानाचे  उदात्तीकरण आम्ही कदापि खपवून घेणार नाही ; म्हणूनच आज शिवप्रताप दिनी सरकारने प्रतापगडाच्या पायथ्याशी कारवाई करुन  अतिक्रमण पाडले अशी प्रतिक्रिया राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य  मंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. 


महाराजांना राज्याच्या स्वराज्यहितवादी सरकारकडून  हा मानाचा मुजरा आह़े, असेही  मुनगंटीवार म्हणाले.

प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाची लढाई आहे. शौर्य, धैर्य आणि महाराजांची चतुराई यासाठी ही लढाई अजरामर ठरली . 10 नोव्हेंबर 1659 हा तो दिवस.  आपण तो शिवप्रताप दिन म्हणून साजरा करतो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि आमचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या रूपाने आलेले स्वराज्यावरील संकट  खानाचा शिताफीने वध करून संपविले. संख्येने दुप्पट-तिप्पट असलेल्या त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतवून लावले. 



हा आमच्याकरिता अभिमानाचा विषय आह़े. परंतु  29 जुलै 1953 मध्ये  प्रतापगडाच्या पायथ्याशी स्वराज्यद्रोही अफजलखानाची कबर  तयार करण्यात आली आणि एका सन्स्थेला लीजवर  ही जागा देण्यात आली होती. तेव्हापासून शिवप्रेमी जनतेत असंतोष होता.


 यासाठी अनेकदा आंदोलने झाली, तक्रारी झाल्या अगदी प्रकरण कोर्टापर्यंत गेले. दरम्यान सन 2008 मध्ये सदर जागेची मुदत संपली; त्यानंतरही अतिक्रमण हटविण्यासंदर्भात कारवाई झाली नव्हती  होती. अखेर शिवप्रताप दिनाचा मुहुर्त राज्य सरकार ने पाहून आज  ही कारवाई केली. राज्य सरकारला या कारवाईचे समाधान असून छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात यापुढे स्वराज्यद्रोही कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत असा इशारा देखील त्यांनी दिला.

Previous Post Next Post