Top News

Chitratai Wagh, State President of BJP Women's Morcha, visited Chandrapur district on November 13.

भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्‍यक्ष चित्राताई वाघ यांचा १३ नोव्‍हेंबरला चंद्रपूर जिल्‍ह्याच्या दौर्यावर.....


चंद्रपूर शहर व ग्रामीण भाजपा महिला आघाडीचे आयोजन..... 



विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्‍या नवनियुक्‍त प्रदेशाध्‍यक्ष सौ. चित्राताई वाघ यांनी पक्षाच्‍या विचारांचा प्रचार व प्रसार करण्‍याकरिता व पक्ष बळकटीकरणासोबतच महिला सशक्‍तीकरणासाठी राज्‍यव्‍यापी दौ-याचे आयोजन केले आहे. या दौ-याचा एक भाग म्‍हणून त्‍या दिनांक १३ नोव्‍हेंबर २०२२ ला चंद्रपूर जिल्‍हयामध्‍ये महिला मेळाव्‍याकरिता येत आहे.

भाजपा महिला चंद्रपूर शहर व ग्रामीण यांच्‍या वतीने दिनांक १३ नोव्‍हेंबर २०२२ ला स्‍थानीय महेश भवन, तुकूम, चंद्रपूर येथे भाजपा जिल्‍हा महिला कार्यकर्ता मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे. या मेळाव्‍यामध्‍ये सौ. चित्राताई वाघ संबोधित करणार आहेत. या मेळाव्‍यामध्‍ये त्‍या महीला सक्षमीकरणासोबतच गावगाडयातील महिलांपर्यंत भारतीय जनता पक्ष पोहचविण्‍याकरिता व पक्ष बळकटीकरणाकरिता संबोधित करणार आहेत. या मेळाव्‍याला प्रामुख्‍याने राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया, महाराष्‍ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्‍यक्षा सौ. वनिता कानडे, प्रदेश कार्यकारीणी सदस्‍य सौ. रेणुका दुधे, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा संध्‍या गुरनुले, माजी महापौर सौ. राखी कचंर्लावार, आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती राहणार आहे. सदर महिला मेळाव्‍याला भाजपा महिला वर्गांने मोठया संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन भाजपा महिला आघाडी जिल्‍हाध्‍यक्षा कु. अल्‍का आत्राम, चंद्रपूर भाजपा महिला अध्‍यक्षा सौ. अंजली घोटेकर, महामंत्री सौ. वंदना आगरकाटे, विजयालक्ष्‍मी डोहे, सायरा शेख, सौ. शिला चव्‍हाण, प्रज्ञा बोरगमवार यांनी आवाहन केले आहे.

Previous Post Next Post