मुल येथे शेतशिवारात कोंबड्यांची झुंज लावनार्यांना पोलिसांचा दनका.......
2 लाख 15 हजार 400 रुपयाचा मुद्देमाल मुल पोलिसांनी घेतला ताब्यात.......
विदर्भ माझा न्युज 24 - मुल
अवैद्यरित्या कोंबडयांची झुंज लावून त्यावर पैश्याची बाजी लावून जुगार खेळतांना दोन लाखाचा ऐवज मूल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. जुगार खेळणा-या ६ जणांना अटक करुन सुटका केली आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मूलचे उपविभागीय अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे आणि पोलिस निरीक्षक सतिशसिंह राजपुत यांचे मार्गदर्शनात गुन्हे शाखा पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार चिमाजी देवकाते, श्रावण कुत्तरमारे, शफीक शेख, संजय जुमनाके आणि स्वप्नील खोब्रागडे यांनी सापडा रचून पोलीस स्टेशन हद्दीतील येरगांव येथील शेतशिवारात धाड मारून दिलीप डोनुजी निकुरे रा. चिमढा, पुनेश्वर कवडू नागोसे, रा. चितेगांव, प्रमोद हरीचंद्र गावतुरे रा. हळदी, मारोती चरणदास पिंपळे रा. हळदी आणि सुधीर मधुकर मुनगंटीवार रा. हळदी या ६ जणांना ताब्यात घेवून त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
त्यांचे पासून 3 कोंबळे, नगदी 2700 रुपये, 4 मोबाईल व 4 मोटार सायकल असा एकुण 2 लाख 15 हजार 400 रुपयाचा ऐवज हस्तगत केला असून गुन्हा दाखल केलेल्या सहा जणांविरुध्द कारवाई करून जामीनावर मुक्तता केली आहे.

