Top News

#Breaking News_Finally within 24 hours he who vandalized Hanuman idol was arrested by Balharshah police.......

अखेर २४ तासाच्या आत हनुमान मुर्तीची तोडफोड करणारा तो बल्हारशाह पोलिसांच्या ताब्यात.......


विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह

चंद्रपूर जिल्हातील बल्हारशाह तालुक्यातील चंद्रपूर बल्हारशाह मार्गावरील मातोश्री वृद्धाश्रम समोरील हनुमान मंदीर येथे काही समाजकंटकांनी हनुमान मुर्तीची तोडफोड केली याबाबत हिंदु सामाजिक संघटना व जनतेमध्ये प्रचंड जन आक्रोश निर्मान झाला. 

हेही वाचा 👉🏻  बल्हारशाह - चंद्रपूर मार्गावरील हनुमाण मंदीरातील मुर्तीची विटंबना.....भक्तांन मध्ये आक्रोश.........

काही वेळ चंद्रपूर बल्हारशाह मार्गावर चक्का जाम आंदोलनही करण्यात आले घटनेची माहीती बल्हारशाह  पोलिसांना मिळताच पोलिस घटना स्थळी दाखल झाली,प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने आरोपीला त्वरीत शोध घेऊन अटक करण्याचे आश्वासन ही दिले. 

हेही वाचा 👉🏻  बल्हारशाह - चंद्रपूर मार्गावरील हनुमाण मंदीरातील मुर्तीची विटंबना.....भक्तांन मध्ये आक्रोश.........

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील जिल्हा पोलिस अधिक्षकांना २४ तासाच्या आत कार्यवाही करून आरोपीला अटक करण्याचे निर्देश दिले, पोलिसांनी जलद गतीने तपास करीत अखेर आरोपीला २४ तासाच्या आत अटक केली. 

हेही वाचा 👉🏻  बल्हारशाह - चंद्रपूर मार्गावरील हनुमाण मंदीरातील मुर्तीची विटंबना.....भक्तांन मध्ये आक्रोश.........

सदर घटनेबाबत बल्हारशाह पोलीस स्टेशन येथे अप.क्र. 1128/2022 कलम 295 भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेण्याकरिता पोलीस अधीक्षक, चंद्रपूर ह्यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचे नेतृत्वात पोलीस स्टेशन बल्हारशाह येथील सपोनि विकास गायकवाड यांचे सोबतच्या डिबी पथकातील अंमलदारांचे व पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे नेतृत्वात सपोनि जितेंद्र बोबडे, सपोनि संदिप कापडे, सपोनि मंगेश भोयर यांचे सोबत स्थागुशा येथील अंमलदारांचे वेगवेगळे पथक तयार करून अज्ञात आरोपीची शोध मोहीम चालु केली.
अधिक चौकशी केली असता तो नागपूर येथील रहिवासी असुन तो मागील एक महिन्यापासून घरून निघून आल्याचे निदर्शनास आले. सकृतदर्शनी सदर इसम हा मनोरुग्ण असल्याचे दिसुन येत असुन त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे.


सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थागुशा चंद्रपूर, पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सपोनि विकास गायकवाड, सपोनि रमीज मुलानी, स.फौ. सलीम शेख, पो.हवा. आनंद परचाके, सुधाकर वरघने, सतिष पाटील, लेकेश नायडू, ना.पो.कॉ. सत्यवान कोटनाके, पो. कॉ. शेखर मातनकर, दिलीप आदे श्रीनिवास वाभिटकर, प्रसन्ना, मपोकॉ. सिमा पोरते, चालक ढवस पोस्टे बल्लारपूर यांनी केली असून पुढील तपास पो. नि. उमेश पाटील हे करीत आहेत. पोलिसांनी केलेल्या जलद तपासाबाबत पोलिसांच्या या कामगीरी  बद्दल पोलिसांचे सर्व संघटने तर्फे व हनुमान भक्तांन तर्फे कौतुक केल्या जात आहे.


 


 


Previous Post Next Post