Top News

#Breaking News_ Desecration of idol in Hanuman temple on Balharshah-Chandrapur road.....Outcry among devotees.........

बल्हारशाह - चंद्रपूर मार्गावरील हनुमाण मंदीरातील मुर्तीची विटंबना.....भक्तांन मध्ये आक्रोश.........


त्या समाजकंटकांना अटक करून चांगलीच अद्दल घडवा भक्तांची मागनी......स्थानीक नागरीक संतप्त......


 विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 

              अनेक वर्षांपासून बल्हारशाह चंद्रपूर महामार्गावर  निर्मल धाबा च्या समोर  हनुमान मंदिर स्थित आहे त्या ठिकाणी भक्तगन नतमस्तक होतात.

 श्रद्धा भावनेने मंगळवार आणी शनिवार त्या ठिकाणी पूजा अर्चना करतात. त्याच ठिकाणी काल रात्रीला अधर्मी तत्वाच्या असामाजिक समाजकंटकांनी मंदिरातील मूर्ती तोडून फेकली हनुमाणाच्या मुर्तीची विटंबना झाल्याने यावर अनेक भक्तांचे मन दुखावले गेलेले आहे. 


पहाटे नागरीकांना माहीत होतास नागरीकांनी व हनुमाण भक्तांनी त्या ठिकाणी गोळा होऊन पोलीस प्रशासनाला बोलवले. 


         सदर ठीकानी मोठ्या संख्येत भक्तजन गोळा होत असुन बल्हारशाह पोलीस प्रशासन घटना‌स्थळी पोहचुन पंचनामा करून पुढील तपास करीत आहे.


हणुमानाच्या मुर्तीची विटंबना झाल्या मुळे स्थानीक नागरीक संतप्त झाले असुन तपास जलद गती ने करून सदर क्रुत्य करणार्या त्या असामाजिक तत्वाच्या समाजकंटकांना ताबडतोब अटक करून कठोर कार्यवाही करण्याची‌ मागनी आता भक्तांनकडुण केली जात आहे.


Previous Post Next Post