मोठी बातमी.....पोलिस अधिक्षकांना हनुमान मुर्तीच्या तोडफोड प्रकरणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे चौकशीचे निर्देश........
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
हेही वाचा 👉🏻 बल्हारशाह - चंद्रपूर मार्गावरील हनुमाण मंदीरातील मुर्तीची विटंबना.....भक्तांन मध्ये आक्रोश.........
बल्हारशाह तालुक्यातील विसापूर गावानजिक भिवकुंड नाल्याजवळ श्री हनुमान मुर्तीची काही समाज कंटकांनी तोडफोड केल्याप्रकरणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आता पोलिस अधिक्षकांना सदर प्रकरणाची चौकशी करत दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा 👉🏻 बल्हारशाह - चंद्रपूर मार्गावरील हनुमाण मंदीरातील मुर्तीची विटंबना.....भक्तांन मध्ये आक्रोश.........बल्हारशाह तालुक्यातील विसापूर गावानजिक भिवकुंड नाल्याजवळ काही समाजकंटकांनी श्री हनुमान मुर्तीची विटंबना व तोडफोड केल्यामुळे विसापूर सह बल्हारशाह येथील नागरीकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. धार्मीक भावना दुखावल्याने नागरिक संतप्त झाले आहे.
परिस्थीती चिघळू नये यादृष्टीने तातडीने पोलिस प्रशासनाने हस्तक्षेप करून परिस्थीती आटोक्यात आणावी व चौकशीअंती दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिस अधिक्षकांना दिले आहे.


