Top News

Quickly arrest the social miscreants vandalizing Hanuman idol - Mohit Dangore District Vice President, BJYU

हनुमाण मुर्तीची तोडफोड करून विटंबना करणार्या समाजकंटकांना त्वरीत अटक करा - मोहीत डंगोरे जिल्हा उपाध्यक्ष,भाजयुमो



विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 


हिंदु धर्मात मार्गशीर्ष महिन्याला महत्वाचे स्थान असून ह्या महिन्यात अनेक व्रतवैकल्य तसेच धार्मिक स्थळी यात्रांचे आयोजन देवस्थाना जवळ स्वयंपाक केल्या जाते. हिंदु धर्मात ह्या महिन्यात हनुमानाच्या उपासनेला विशेष महत्व असते. मात्र ह्याच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच दिवशी हिंदुंच्या आस्थेवर घाला घालण्याचा प्रकार समोर आला.

  बल्हारशाह चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील सैनिक शाळेच्या समोर असलेल्या भिवकुंड नाल्याच्या काठावर असलेल्या हनुमान मंदिरात अज्ञात समाजकंटकांनी धुडगुस घालुन मूर्तीची विटंबना केल्याची घटना घडली.


अज्ञाताने केवळ विटंबनाच केली नसुन मंदिरातील मुर्तीची तोडफोड करून मूर्तीचे तुकडे फेकुन दिल्याचे उघडकीस आले आहे. सदर घटना रात्रीच्या वेळी घडली असल्याची शक्यता असुन मंदिराची विटंबना झाल्याचे सकाळी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांच्या लक्षात आले. हनुमान मुर्तीची तोडफोड झाल्याचे कळताच लगतच्या विसापूर,बल्हारशाह व चंद्रपूर येथिल हनुमान भक्तांनी तसेच विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, भाजपा कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असुन हिंदुंच्या श्रद्धेवर घाला घालणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करत काही वेळ चक्का जाम करण्यात आले, पोलिसांनी घटना स्थळी पोचत पंचनामा केला व‌ आरोपींचा शोध घेण्यासाठी सुत्र हलवीले घटनेची दखल घेत जिल्हाचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार‌ यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना चौकशीचे निर्देश दिले.


भाजप युवा मोर्चाचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष मोहीत डंगोरे यांनी बल्हारशाह पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन देत ज्यांनी हे कृत्य केले त्या आरोपींना अटक करून त्यांच्या विरूद्ध २४ तासांचा आत प्रशासना तर्फे कडक कार्यवाही करावी अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी केली या वेळी उपस्थित जिल्हा सचिव शिवाजी चांदेकर, सुरज चौबे, मनिष राजभर, गणेश महतो, योगेश गोरडवार, राहुल शाह, राजरत्न तीतरे, शारुख शेख, अतीन पाल, नीरज दुबे, राहुल बेंबंसी, विक्की मांझी, निगम दुबे, विक्की भारती या सह अनेक कार्यकर्ते व हनुमाण भक्तांची उपस्थित होती.

Previous Post Next Post