हत्तेने हादर्ले चंद्रपूर....दुर्गापूर परिसरात युवकाची क्रुर हत्या.....शिर केले धडावेगळे.....
चंद्रपूर जिल्हात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालन्यास नव्या पोलिस अधीक्षकांसमोर मोठे आव्हान.....
विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)
चंद्रपूर लगत असलेल्या दुर्गापूर परिसरात चंद्रपूर वीज निर्मिती केंद्राच्या मेजर गेट जवळ नायरा पेट्रोल पंपजवळ एका इसमाची धारदार शास्त्राने धडावेगळे शीर करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की,दुर्गापूर परिसरात चंद्रपूर वीज निर्मिती केंद्राच्या मेजर गेट जवळ नायरा पेट्रोल पंपजवळ एका इसमाची धारदार शास्त्राने धडावेगळे शीर करून निर्घृण हत्या करण्यात आली ही घटना सोमवारी रात्री 10.45 वाजताच्या सुमारास घडली. महेश मेश्राम (32) रा. आयप्पा मंदिर परिसर चंद्रपूर असे मृतकाचे नाव असल्याचे बोलले जात आहे.या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याची चर्चा परीसरात आहे.
विशेष म्हणजे, घटनास्थळापासून काहीच अंतरावर दुर्गापूर पोलीस स्टेशन आहे. सुमारे ४-५ जणांनी मिळून आरीने शीर कापून हत्या केल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मीळताच दुर्गापूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच घटनास्थळावरून मृत देह हलविले. दुर्गापूर परिसर हा गुन्हेगारीच्या दृष्टीने अतिसंवेदनशील मानला जातो. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. मृतकाने काही दिवसांपूर्वी कुणाला तरी मारहाण केली होती. यातूनच ही हत्या झाल्याचे परीसरात बोलले जात आहे.
घटनास्थळाजवळ इमली बियर बार आहे. या बारमध्ये भांडण झाले. येथून महेश मेश्राम याला अज्ञात आरोपींनी मारहाण करीत पेट्रोल पंप परिसरात नेले. तेथे दगडाने मारहाण केली. यानंतर धारधार शस्त्राने शीर धडावेगळे करून हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे. रात्री 12.20 वाजता पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला.
घटनास्थळी पोहचुन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी पोलिस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्याकडून घटनेची माहिती जाणून घेतली आहे.जिल्हात वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी नव्या पोलिस अधीक्षकांसमोर मोठे आव्हान आहे.
