Top News

Chandrapur local crime branch handcuffed 8 suspects in the murder case in Durgapur.

दुर्गापूर येथील हत्याकांडातील 8 संशयीत आरोपींना चंद्रपूर स्थानीक गुन्हे शाखेने ठोकल्या बेळ्या......


फील्मी स्टाईल ने पाठलाग करून वर्धे कडे पळुण जात असलेल्या आरोपींना आरंभा टोलनाका येथुन घेतले ताब्यात.....



विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)

दुर्गापूर येथे मृतक नामे महेश मेश्राम 32 वर्षीय युवकाच्या निर्घुण हत्या करून पळून जाताना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने पाठलाग करून आरंभा टोल नाका, जिल्हा वर्धा येथुन 8 आरोपींना अटक केली आहे .

हेही वाचा 👉🏻  हत्तेने हादर्ले चंद्रपूर....दुर्गापूर परिसरात युवकाची क्रुर हत्या.....शिर केले धडावेगळे.....

 सोमवारी दिनांक. 07/11/2022 रोजी 10 :30 वा . ते 11 : 45 वा चे सुमारास पो.स्टे. दुर्गापूर हद्दीत ईमली बार व नायरा पेट्रोल पंप समोर दुर्गापूर रोडवर पुर्व वैमन्यास्यातून 7 ते 8 इसमांनी मृतक नामे महेश मेश्राम ( 32 ) रा . दुर्गापूर हा ईमली बार येथे मित्रा सोबत गेला असतांना नमुद आरोपीतांनी त्यांचेवर पाळत ठेवून घेराव घालून धारदार घातक शस्त्रांनी वार करून जिवानीशी ठार केले व त्याचे शिर निर्दयपणे धडावेगळे करून घटनास्थळापासून अंदाजे 50 मिटर दूर फेकून पळून गेले.

  दुर्गापूर पोलीस स्टेशनला अप. क्र. 189/2022 कलम 302 , 143 , 147 , 149 , 427 भा.द.वी. सह कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. हेही वाचा 👉🏻  हत्तेने हादर्ले चंद्रपूर....दुर्गापूर परिसरात युवकाची क्रुर हत्या.....शिर केले धडावेगळे.....

पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत गुन्ह्यातील आरोपीतांचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिले.

 स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर,सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे यांचेसह चार विशेष शोध पथके गठीत करण्यात आली. 

हेही वाचा 👉🏻  हत्तेने हादर्ले चंद्रपूर....दुर्गापूर परिसरात युवकाची क्रुर हत्या.....शिर केले धडावेगळे....

सदर पथकांनी अज्ञात आरोपींचे नाव व त्यांचे गोपनिय माहिती प्राप्त करून तांत्रीक तपास केला असता यातील संशयीत आरोपी इसम हे वर्धा जिल्हयात स्कॉर्पीओ गाडीने पळुन जात असल्याची माहिती प्राप्त झाली.

त्यावरून लगेच सदर वाहनाचा मार्ग काढून स्थानीक गुन्हे शाखा चे सपोनि कापडे व सपोनि भोयर यांचे पथकांनी पाठलाग करून सदर स्कॉर्पीओला आरंभा टोल नाका, जिल्हा वर्धा येथे दोन वाहने आडवे लावून अडविले. मोठ्या शिताफीने  आरोपी नामे 1 ) अतुल मालाजी अलीवार , वय 22 वर्ष रा . समता नगर वार्ड क्र.6 दुर्गापुर, 2 ) दिपक नरेंद्र खोब्रागडे, वय 18 वर्ष रा. समता नगर वार्ड क 6 दुर्गापुर, 3 ) सिध्दार्थ आदेश बन्सोड, वय 21 वर्ष रा. नेरी दुर्गापुर, 4 ) संदेश सुरेश चोखान्द्रे, वय 19 वर्ष रा. सम्राट अशोक वार्ड क 2 दुर्गापुर चंद्रपुर, 5 ) सुरज दिलीप शहारे वय 19 वर्ष रा . समता नगर वार्ड के 8 दुर्गापुर, 6 ) साहेबराव उत्तम मलिये वय 45 वर्ष रा. नेरी समतानगर वार्ड क 6 दुर्गापुर, 7 ) अजय नानाजी दुपारे वय 24 वर्ष रा. उर्जानगर कोंडी दूर्गापुर, 8 ) प्रमोद रामलाल सुर्यवंशी, वय 42 वर्ष, रा. उर्जानगर दुर्गापुर अश्या एकूण 8 संशयीत आरोपींना स्कॉर्पीओ वाहनासह अवघ्या काही तासात ताब्यात घेतले.

हेही वाचा 👉🏻  हत्तेने हादर्ले चंद्रपूर....दुर्गापूर परिसरात युवकाची क्रुर हत्या.....शिर केले धडावेगळे....

सदर संशयीत आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखेत आणुन चौकशी केली सहा आरोपींचा गुन्हयात प्रत्यक्ष सहभाग असून दोन आरोपी यांनी आपले ताब्यातील चारचाकी स्कॉपीओ वाहन क्र. MH 04 GZ 9091 नी वरिल नमुद आरोपींना पळून जाण्यास मदत केली. सर्व आरोपींना पोलीस स्टेशन दुर्गापूर यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहेत.

हेही वाचा 👉🏻  हत्तेने हादर्ले चंद्रपूर....दुर्गापूर परिसरात युवकाची क्रुर हत्या.....शिर केले धडावेगळे....

 ही  कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर याचे नेतृत्वात स्था.गु.शा.चे स.पो. नि. जितेंद्र बोबडे, स.पो.नि.संदीप कापडे, स.पो.नि. मंगेश भोयर,पो. उपनि कावळे, पो.हवा. संजय आतकुलवार, धनराज करकाडे, सुरेंद्र महतो, नितीन साळवे, ना.पो.कॉ. सुभाष गोहोकार, संतोष येलपूलवार, जमीर पठाण, मलिंद चव्हाण, गजानन नागरे, अजय बागेसर, पो.कॉ.गोपाल आतकूलवार, नितीन रायपुरे, रविंद्र पंधरे, गणेश भोयर, गणेश मोहुर्ले, मिलींद जांभुळे, प्रशांत नागोसे, गोपीनाथ नरोटे, महीला अंमलदार अपर्ना मानकर तसेच सायबर पोस्टे येथील पोहवा मुजावर अली यांनी केली आहे.

हेही वाचा 👉🏻  हत्तेने हादर्ले चंद्रपूर....दुर्गापूर परिसरात युवकाची क्रुर हत्या.....शिर केले धडावेगळे....

Previous Post Next Post