बाळासाहेबांची शिवसेने च्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी कमलेश शुक्ला यांची नियुक्ती
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
बाळासाहेबांची शिवसेने च्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी कमलेश शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली. कमलेश शुक्ला हे कट्टर शिवसैनीक असुन मागील ३० वर्षा पासुन शिवसेनेत कार्यरत आहेत. कमलेश शुक्ला यांची नियुक्ती नितीन मत्ते जिल्हा प्रमुख, बंडु हजारे सह संपर्क प्रमुख व आशीष ठेंगने यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. कमलेश शुक्ला यांच्या नियुक्तीने शिवसैनीकांत युत्साह संचारला असुन, येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना कमलेश शूक्ला यांच्या नेतृत्वात घावघवीत यश संपादन करेल असे मत कनेक शिवसैनीकांनी व्यक्त केले आहे.
