Top News

विदर्भाचा वाघ...स्वतंत्र विदर्भ राज्याच्या चळवळीचे शिलेदार राम नेवले यांच्या जयंती निमीत्य विषेश लेख........

विदर्भाचा वाघ...स्वतंत्र विदर्भ राज्याच्या चळवळीचे शिलेदार राम नेवले यांच्या जयंती निमीत्य विषेश लेख........


नक्षलवादी आणी सि 60 जवानांन मध्ये कापेवंचा जंगल परिसरात जोरदार चकमक.......

 विदर्भ माझा न्युज 24 - 

स्वर्गीय राम नेवले साहेब यांचा जन्म १ आक्टोम्बर १९५१ रोजी विदर्भातील नरखेड तालुक्यात एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला.

शेतकरी कुटुंबातील आर्थिक चटके सहन करत उच्चशिक्षित झालेले राम नेवले शेती क्षेत्रातच काहीतरी करायचं या भावनेतून अगदी तरुणपणी शेतकरी संघटना व युगात्मा शरद जोशींच्या विचाराने प्रभावित होऊन पुर्णवेळ शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते झालेत,

नक्षलवादी आणी सि 60 जवानांन मध्ये कापेवंचा जंगल परिसरात जोरदार चकमक....... https://youtu.be/4XNuzUYWZ4Q

आपल्या संघटन कौशल्याने नरखेड- काटोल तालुक्यात शेतकरी संघटनेची बांधणी करत एकापेक्षा एक सरस अशी कार्यकर्त्यांची फौज तालुक्यात उभी केली.

शेतकरी संघटनेच्या कामातील त्यांचा प्रामाणिकपणा व दरारा इतका होता की पुढे चालुन शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली,

नक्षलवादी आणी सि 60 जवानांन मध्ये कापेवंचा जंगल परिसरात जोरदार चकमक....... https://youtu.be/4XNuzUYWZ4Q

पुढे चालुन माजी आमदार ऍड वामनराव चटप साहेब यांचे सहकार्याने विदर्भ राज्य आंदोलन समितीची स्थापना करत नेवले साहेबांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचे आंदोलनात आपले सर्वस्व वाहून घेतले,

मी साहेबांना वृत्तवाहीनी, वृत्तपत्रांच्या माध्यमातुन ते शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष असल्यापासून साहेबांना ओळखत असलो तरी विदर्भ राज्याच्या आंदोलनाच्या माध्यमातून साहेबांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलो, वयाच्या उतारवयातही त्यांच्यातील आक्रमकता व स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवुन घेण्याची तळमळ यामुळे आपण विदर्भ राज्य मिळवु हा विश्वास आम्हा विदर्भातील तरुणांना मिळाला.

नक्षलवादी आणी सि 60 जवानांन मध्ये कापेवंचा जंगल परिसरात जोरदार चकमक....... https://youtu.be/4XNuzUYWZ4Q

आज राम नेवले साहेब आपल्या सोबत नसले तरी त्यांनी पाहिलेले स्वतंत्र विदर्भ राज्याचे स्वप्न माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांचे नेतृत्वात पुर्ण करुच हा विश्वास विदर्भातील हजारो तरुणांना आहे.

स्वर्गीय राम नेवले साहेब यांच्या ७२ जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन......

Previous Post Next Post