Top News

महिलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम बतुकम्मा उत्सवात सहभाग

महिलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम बतुकम्मा उत्सवात सहभाग.....



  विदर्भ माझा न्युज 24 - गडचिरोली  


अहेरी उपविभागात सध्या बतूकम्मा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.अहेरी तालुक्यातील बोरी,रामपूर चेक,ओड्डीगुडम,राजपूत पॅच आदी गावात माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी भेट देऊन या उत्सवात सहभाग घेतल्याने महिलांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

तेलंगाणा राज्यात बतुकम्मा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.अहेरी उपविभागातील सिरोंचा,अहेरी ही दोन्ही तालुके महाराष्ट्र आणि तेलंगाणा या दोन राज्यांना दुभागणाऱ्या प्राणहिता नदी काठावर असून तेलंगाणा राज्याशी रोटी-बेटीचे व्यवहार आहेत.त्यामुळे तेलंगाणा राज्याची संस्कृती याही ठिकाणी जपली जाते.प्राणहिता नदीकाठच्या गावामध्येही मागील कित्येक वर्षांपासून बतुकम्मा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे.या उत्सवात महिला आणि मुली मोठ्याप्रमाणात सहभागी होतात.

 सदर उत्सवात भाग्यश्री आत्राम दरवर्षीच सहभागी होतात.याही वर्षी भाग्यश्री आत्राम  यांनी विविध गावांत भेटी देऊन बतुकम्मा  उत्सवात महिला व मुलींचा आनंद द्विगुणीत करताना दिसत आहेत.त्यामुळे गावातील महिला आणि मुलींमध्ये आनंदाचा वातावरण दिसून येत आहे.एवढेच नव्हे तर या उत्सवात त्या स्वतः रमल्याचेही दिसत आहेत.दरवर्षी या उत्सवात ताई आवर्जून उपस्थित होत असल्याने बतुकम्मा मंडळाच्या महिला सुद्धा ताईंना आवर्जून निमंत्रण देत असतात हे विशेष.

Previous Post Next Post