💥 विदर्भात एक असा रस्ता जिथे गाडी चालवीतांना येते घोडेस्वारी ची मजा.....
⭕ झरी तालूक्यातील जामणीच्या रस्त्यावर नागरिकांना घेता येत आहे येते गाडीवर घोडेस्वारी ची मजा.......
⭕ स्थानीक आमदारांनी व मुख्यमंत्रांनी या रसत्यावरून एकदा तरी दुचाकीने करावा प्रवास....गावकर्यांची विनंती....
विदर्भ माझा न्युज 24 - झरी
विदर्भातील यवतमाळ जिल्हात असलेल्या झरी तालुक्यातील जामणी हे गाव एक किलोमीटर वर लागणूच आहे. ह्या गावात एकूण १११९लोकसंख्या आहे. गेल्या झरी नगरपंचायत निवडणुकीत जामणी गावाला सामावून नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे.
शिक्षण घेण्याकरिता विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात झरी ला येतात.नागरिकांना पण छोट्या मोठ्या कामांसाठी रोज ये जा करावी लागते. पण रस्त्याची दुर्दशा इतकी आहे कि नागरिकांना गाडीवर सुद्धा घोडेस्वारी चा आस्वाद घेता येतो.
रस्ता बनवून अंदाजे 25 वर्ष पूर्ण झाले. पण रस्त्याची दुरुस्ती फक्त एकदाच झाली. सारख्या पडलेल्या खड्यामुळे नागरिकांना ये जा करण्याकरिता खूप त्रास सहन करा लागत आहे.ज़िल्ला परिषद बांधकाम विभाकाकडे वारम वार तक्रारी करून सुद्धा रस्ता बनत नाही असे नागरिकांचे मत आहेत.
आता जामणी नगरपंचायत झरी मध्ये आल्यामुळे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग ( pwd ) यांचे कडे गेल्याचे कळते. आता रस्ता केव्हा बनेल या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तर एक दा तरी स्थानीक आमदारांनी व मुख्यमंत्रांनी या रसत्यावरून दुचाकीने प्रवास करावाअशीही आता जामनीतील गावकर्यांची विनंती आहे.


