त्रिरत्न बौद्ध महासंघ बल्हारशाह द्वारा आयोजित एक दिवसीय धम्म शिबीर.....
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
त्रिरत्न बौद्ध महासंघ बल्हारशाह द्वारा आयोजित एक दिवसीय धम्म शिबीर आज दि.15.9.2022 ला मिलिंद बालवाड़ी, संतोषी माता वार्ड, बल्हारशाह येथे संपन्न झाले. शिबिराचे नेतृत्व नागलोक, नागपुर येथिल धम्मचारिणी सम्यका यांनी केले. "मानवाच्या कल्याणासाठी धम्म" या विषयावर मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, "धम्म हा पुस्तकात किन्वा प्रवचनात नसुन तो आचरणात आहे. धम्म आचरणानेच आपसातील संबंध सुधरता येतील आणि परस्परातील बंधुत्व वाढिस लागेल"
सुरुवातीला त्रिशरण पंचशील, विधायक शील आणि बुद्ध पूजाचे नेतृत्व धम्ममित्र संध्या गावड़े यांनी केले तर धम्ममित्र भास्कर भगत यांनी आनापान सति या ध्यानाची माहिती देवुन सराव करून घेतला.
दुस-या सत्रात ही धम्मचारिणी सम्यका यांनी त्रिरत्न बौद्ध महासंघाविषयीचे समज गैरसमज याविषयी श्रोत्यानी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली आणि जागतिक स्तरावर चालत असलेल्या संघाच्या कार्याची माहिती दिली. महामंगल सुत्त आणि धम्मपालन गाथेने शिबिराची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयु. प्रकृति पाटिल मैडम यांनी केले. शिबिराला मोठ्या संखेने उपस्थिति होती.
