झरी चे शेतकरी सततच्या पावसामूळे चिंतेत......
विदर्भ माझा न्युज 24 - झरी
यवतमाळ जिल्हातील झरी तालुका हा पूर्ण ता शेतीवर अवलंबून असतो, शेतीव अवलंबुन असलेल्या झरी तालुक्यातील शेतकरी मात्र या वर्षी तिंतेत दिसते आहे,
शेकर्यांचे चिंतेचे कारण जानुण घेण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा कडाले की या वर्षी होणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामूळे पूर्ण पीक हातात येईल कि नाही?अशी चिंता आता शेतकऱ्यांना वाटत आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक आहेत.
बँकेकडून कर्ज घेऊन किंवा सावकारुकडून कर्ज घेऊन आपल्या शेतीचे संगोपन येथील शेतकरी करतात. पण मात्र यंदा वर्षी होणाऱ्या सततच्या पावसामूळे बहुतांश शेतकऱ्यांचे पीक गेल्यातच आहे. आता कर्ज कसे फेडायचे ही चिंता शेतकऱ्यांचा मानेची सूरी बनली आहे.
मात्र काही ना काहीतरी राज्य सरकार करेल का? फुल नाही तर फुलाची पाखडी म्हणुन काह मदत करेल? याच्या कडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले असुन, सद्या तरी शेतकरी राज्य सरकार कडे आस लावून बसले आहे. आता सरकार नुकसानग्रस्थ शेतकर्यांन साठी काय पाऊल उचलतात हे महत्वाचे आहे.
