Top News

वाघाच्या हल्ल्यात एक गाय जखमी...तर एक गाय ठार....

वाघाच्या हल्ल्यात एक गाय जखमी...तर एक गाय ठार....


झरी तालुक्यातली घटना.....



  विदर्भ माझा न्युज 24 - झरी  


झरी तालुक्यातील चिखलडोह गावच्या शिवारात वाघाने गाये वर हल्ला करून एक गाय ठार केली तर एक गाय जखमी ही घटना काल घडली असुन सवीस्तर वृत्त असे आहे की,  चिखलडोह गावच्या शिवारात झरी तालुका पूर्ण राणमाळ व जंगलाचा भाग आहे. गावातील जनावर चरण्यासाठी जंगलात न्यावी लागते.इथल्या जंगलात वाघाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

वर्ष भरात वाघाचे हल्ले माणसावर आणि जनवरावर  होतच राहतात अशीच घटना मनजे मागील वर्षी पिवरडोल येथील तरुण रात्री सौचालयास गेला असता वाघाने त्याला ठार केले होते.

वनविभागाने  जंगलला तार कपाउंड करावे जेणे करून जंगली जाणवरापासून शेतीमालाचे आणि जीव प्राण्यांचे नुकसान होणार नाही.

अशी मागणी नागरिकांकडून होत आहे..हल्यात जख्मी किंवा ठार झालेल्याना वनविभाग आर्थिक मदत  करतो पण पैश्या पेक्ष्या जीव अनमोल आहे.

जंगलला जर कंपाउंड केले तर नुकसाकन पन होणार नाही. आणि जंगलाची सुरक्षा पण होईल..

Previous Post Next Post