वन विभागाच्या वतिने वन शहिद दिन कार्यक्रम संपन्न.....
वन शहिद कुटुंबांना इतरांप्रमानेच मदत मिळवुन देणार आमदार कृष्णा गजबे यांची ग्वाही.....
विदर्भ माझा न्युज 24 - देसाईगंज
देसाईगंज वन विभागाच्या वतिने वन शहिद दिन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला आमदार कृष्णा गजबे उपवन संरक्षक धनंजय वायभासे सहाय्यक उपवन संरक्षक मनोज चव्हान सिआरपिएफ कमांडेन्ट शैलेन्द्र कुमार आलोक अवस्थी वैद्यकिय अधिक्षक डॉ अविनाश मिसार संयुक्त वन समितीचे नितिन राउत प्रमोद झिलपे यांचेसह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करतांना आमदार कृष्णा गजबे म्हणाले की जंगल ही राष्ट्रिय संपत्ती असुन या संपत्तीचे व वन्य प्राण्यांचे रक्षन करतांना अनेक वनमजुर वन कर्मचारी व अधिकार्यांना विर मरण आले.
अनेक तस्करांकडुन हल्ले होऊन प्राण गमवावा लागला त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आज वन विभागाच्या वतिने जैव वैविधतेच्या प्रांगणात वनशहिदांना शहिद दिनाच्या माध्येमातुन कार्यक्रम होत आहे. ही अतिशय गौरवाची बाब आहे. गडचिरोली जिल्ह्यात १२ वन कर्मचारी शहिद झाले त्यांच्या कार्याची दखल शासनाच्या वतिने घेणे आवश्यक आहे. पोलिस विभागात किंवा सैन्य विभागात कर्तव्यावर असतांना शहिद झालेल्यांचे कुटुंबियांना शासनाच्या वतिने मदत दिली जाते.
त्याच धर्तिवर शहिद वन कर्मचार्यांच्या कुटुंबियांना मदत मिळणे आवश्यक असुन या क्षेञाचा आमदार म्हनुण वनमंञ्यांकडे व मुख्यमंञ्यांकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही या प्रसंगी आमदार गजबे यांनी दिली वन विभागाच्या वतिने आपल्या कर्तव्यात उल्लेखनिय कामगिरी करणार्या वनपाल अधिकारी रमेश घुटके वनरक्षक देवाजी गोटा वनरक्षक सय्यद यांना सन्मानचिन्ह देवुन गौरविण्यात आले. या प्रसंगी वन विभागाच्या वतिने रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ही करण्यात आले.



