Top News

त्या अडेगाव-खातेरा-तेजापूर अतिक्रमण करून उपजीविका करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी धावून आले युवा नेते मंगेश पाचभाई

त्या अडेगाव-खातेरा-तेजापूर अतिक्रमण करून उपजीविका करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी धावून आले युवा नेते मंगेश पाचभाई


200 पोलीस बंदोबस्तात काढणार होते महसूल विभाग अतिक्रमण


चक्क आधल्या दिवशी मिळाला उशिरा  कोर्टाचा  स्तगिती आदेश




 विदर्भ माझा न्युज 24 - अडेगाव 

 अडेगाव-खातेरा परिसरात अडेगाव मध्ये सरकारी जमिनी वर अतिक्रमण करून शेती करणार्याव 70 शेतकरी यांचे अतिक्रमण काढण्याबाबत जिल्हाधिकरी यांनी आदेश पारित केले असता या आदेशाविरोधात युवा नेते मंगेश पाचभाई  याच्या नेतृत्वाखाली शेतकरी यांनी  पांढरकवडा न्यायालयात दावा दाखल केला असता प्रकरणी स्तगिती आदेश पारित झाले आहे. 

प्रशासन यांनी संपूर्ण तयारी करत 200 पोलीस बंदोबस्तात  ट्रेकर लावायची तयारी केली असता आधल्या दिवशी स्तगिती आदेश सायंकाळी धडकल्याने प्रशासनाची भभेरी उढली आणि समस्त शेतकरी हे मागील 30 वर्षांपासून अतिक्रमण करून आपली उवजीविक भागवत आहे त्या सर्व शेतकऱ्यांनि मंगेश पाचभाई यांचे धन्यवाद मानले.

Previous Post Next Post