Top News

सावळी सदोबा परिसरातील जि.प. बांधकाम विभाग अंतर्गत पालकमंत्री पांदन रस्ताची दयनीय अवस्था

सावळी सदोबा परिसरातील जि.प. बांधकाम विभाग अंतर्गत पालकमंत्री पांदन रस्ताची दयनीय अवस्था....




  विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी  

आर्णी तालुक्यातील असलेल्या जि.प.यवतमाळ अंतर्गत झालेल्या पांदन रस्त्याची सावळी- इचोरा गणामध्ये पांदन रस्त्याचे काम झाल्यावर दोन वर्षाचे कार्यकाळ लोटून गेले आहे, जि.प. उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग क्र.२ अंतर्गत पांदन रस्त्याची निर्मिती करण्यात आली होती, शेतकऱ्याच्या शेतापर्यंत बांधापर्यंत रस्ता पोहोचला पाहिजे या दृष्टिकोनातून रस्त्याची निर्मिती करण्यात आली असून सदर त्या रस्त्यावर आज रोजी बैलगाडी किंवा मोटरसायकल किंवा शेतमजुरांना जाण्या येण्याची करिता मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे माती मुरूम हे सदर वाहून गेले त आता मोठमोठे डबर किंवा गीट्टा यापासून ठोकरा खावां लागत आहे ,बैलांची किंवा माणसाला जाण्यास मोठ्या प्रमाणावर जोखीम होण्याची भीती घेऊन जावां लागत आहे, याकडे जि.प. उपविभागीय अभियंता अधिकारी या पांदण रस्त्याकडे दुर्लक्ष पणामुळे दयनीय अवस्था  झालेली आहे, अधिकारी व प्रशासकीय जोपर्यंत याकडे लक्षद्वीप करत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला न्याय किंवा रस्त्याची व्यवस्था मिळणार नाही,रस्तावरील शेतकऱ्यांना बैलगाडी शेतात कशाप्रकारे नेण्यासाठी विचार विनिमय लागत आहे.कारण सन २०१९-२०२० झालेल्या पांदन रस्त्याची सावळी-इचोरा गणामध्ये सदर रस्ता दुरुस्त करणे आवश्यक आहे या कडे जिल्हा अधिकारी साहेब यवतमाळ यांच्या कडे लक्ष केंद्रित केले आहे.पादंन रस्तेचं खराब झाली आहे म्हणून सावळी सदोबा परिसरातील नागरिकांनी यावर्षी पालकमंत्री पांदन रस्त्याची निर्मिती करण्यात करिता लक्ष लागले आहे, मुरूम टाकून रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे,जिल्हाधिकारी साहेब उपविभागीय जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी आमच्या सावळी परिसरातील सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळतील का...!

Previous Post Next Post