विदर्भासह जिवती तालुक्यात आत्महत्येचा सत्र सुरूच - सुदाम राठोड
मुख्यमंत्र्यांनी बारकाईने लक्ष देण्याची गरज - जय विदर्भ पार्टी
विदर्भ माझा न्युज 24 - जिवती
विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या जिवती तालुक्यात सह विदर्भात आत्महत्येचा सत्र सुरूच, असे आरोप जय विदर्भ पार्टीचे नेते सुदाम राठोड यांनी मुख्यमंत्री यांना केला आहे.
जिवती तालुक्यात मागील 15 ते 20 दिवसात जवळपास 8 ते 10 आत्महत्या झाल्या आहे, आणि पुन्हा एक तालुक्यातील कागबन येथील युवक शेतकरी माणिक सुभाष सिडाम (वय 17) शेतात विष प्राशन करून केली आत्महत्या.सततच्या नापिकीमुळे व आता झालेली पीक नासोडी मुळे कर्ज बाजारी झाल्याने युवक शेतकऱ्यांने आपला जिवन संपविला आहे.
जय विदर्भ पार्टीचे नेते सुदाम राठोड यांनी या पीडित कुटुंबियांची भेट घेऊन शासनाला विनंती केली आहे की विदर्भात हा आत्महत्येचा जो सत्र सुरू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी याकडे बारकाईने लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली आहे, व तहसीलदार जिवती यांना पंचनामा करून पीडितांना तात्काळ 3 लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी अशी विनंती राठोड यांनी केली आहे.


