तोहोगाव ग्रामपंचायतीचे प्रकरण.....महिला सरपंचाची महिला उपसरपंचाच्या पती विरुद्ध तक्रार.....
शिविगाळ आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा संरपंचांनी केला आरोप......
विदर्भ माझा न्युज 24 - तोहोगाव
तोहोगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत तोहोगाव व पाचगाव या क्षेत्रात विकास कामे सुरू आहेत. त्या कामा अंतर्गत पाचगावात वाढीव पाइपलाइन चे काम सुरु असताना व गावातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच व काही पदाधिकारी सदर ठिकाणी पाहणी करीता गेले असतांना स्थानिक ग्रामपंचायत महिला उपसरपंचाचे पती व उपसरपंच यांनी उपस्थित कमिटीला अर्वाच्य भाषेत शिविगाळ करीत शासकीय कामात ढवळाढवळ केल्याची घटना काल दि.11/9/2022 ला घडली आहे. याबाबत सदर महिला सरपंचा अमावास्या ताडे यांनी कोठारी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
विश्वसनीय सुत्रांनकडुण मिळालेल्या माहितीनुसार व सरपंचाने दिलेल्या तक्रारीवरून अशी माहिती पुढे आली की, तोहोगाव व पाचगाव ग्रामपंचायत अंतर्गत पाचगावात १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून वाढीव पाइपलाइन टाकून ग्रामस्थांना नविन नळ जोडणी देण्याचे काम सुरू आहे. सदर कामाचे कंत्राट जीवती येथील धोंडीबा शिंदे यास ऑफलाईन पद्धतीने देण्यात आले आहे. पाचगावात सदर पाइपलाइन चे काम सुरु आहे.
मात्र कामात तृटी आढळून आल्याने स्थानिक नागरिकांनी सदर पाइपलाइन हि घानयुक्त नाली द्वारे टाकण्यात येत असुन सदर ग्रामपंचायत व कंत्राटदार यांच्या संगनमताने सिमेंट कॉंक्रिटचे रोड न फोडता घानीचे साम्राज्य पसरलेल्या नालीतील घान काढून पाइपलाइन टाकल्या जात असल्याची तक्रार ग्रामपंचायतीला समजताच संरपंच व काही सदस्य शिष्टमंडळाने पाहणी करण्यासाठी कामाचे ठीकाणी गेले. नागरिकांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच स्थळी तोहोगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचाचे पती त्या ठिकाणी हजर झाले. आणि ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना शिविगाळ करीत शासकीय कामात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला. याबाबत कोठारी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
अमावस्या ताडे-सरपंच, तोहोगाव–पाचगाव गट ग्रामपंचायत यांची प्रतिक्रीया.....
” तोहोगाव ग्रामपंचायत अंतर्गत पाचगाव येथे नळ जोडणीचे काम सुरू आहे. यात काही नागरिकांनी सांडपाणी न जाणाऱ्या व उपयोगात नसलेल्या नालीतून चांगला रोड फोळण्यापेक्षा पाइपलाइन टाकण्यास सांगितली. परंतु एक – दोघाणी समोर चालून नाली वाहती झाल्यास पाणी दुषित होण्याची शक्यता दर्शवली. लोकांच्या सुचना पाहता रोड फोडुन पाइपलाइन टाकायची की काही उपाययोजना करता येतील यासाठी कमीटी तिथे पोहचली.
मात्र उपसरपंचा शुभांगी मोरे यांचे पती प्रविण मोरे यांनी मला व माझेसोबत असलेल्या सदस्यांना दारू पिऊन अर्वाच्य शब्दात शिविगाळ केली. तुम्ही इथे कशाला आले, तुमचे कोणते काम आहे चला हटा असे वक्तव्य करीत ग्रामपंचायतीच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांची पत्नी ह्या पदसिध्द उपसरपंच असताना सरपंच व इतर सदस्यांना मानसीक त्रास देवून मनस्ताप करीत असतो तेव्हा त्याचेवर योग्य कारवाई करावी.”अशी मागनी आम्ही कोठारी पोलिस स्टेशन ला केली आहे.
