भंडारी ते शिवर हि एस टी बस सेवा गेल्या दहा वर्षापासून बंद.......
बस सेवा केव्हा सुरु होईल...नागरीक प्रतिक्षेत.....
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
भंडारी ते शिवर हि एस टी बस सेवा गेल्या दहा वर्षापासून बंद झाली आहे, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे, आर्णी भंडारी ते शिवर हे बस सेवा दोन टाईम नियमित सेवा होती मात्र गेल्या दहा वर्षापासून ही बस बंद करण्यात आली आहे,
या मुळे सामान्य नागरीकांना अथक त्रास सहन करावा लागत आहे,या कडे लोक प्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष नाही ही सेवा स्थानीकांना अत्यावश्यक सेवा म्हणून होती मात्र रोड ना दुरुस्ती मुळे काही दिवस ही सेवा बंद करण्यात आली होती, पण आता रोड व्यवस्थित असून सुद्वा गेल्या दहा वर्षापासून बस बंद करण्यात आलेली बस अध्यापही सुरू करण्यात आलेली नाही.
त्या मुळे स्थानीकांना नासक त्रास सहन करावा लागत आहे, समस्त गावकऱ्यांना आस आहे की ही सेवा लवकरात लवकर सुरू होईल.
तर नागरीकांना दळणवळण करण्याकरिता बस सुरू होईल का असा प्रशन आता गावकर्यांन मध्ये निर्माण झाला आहे.

