Top News

Medical officer's stint to primary health center

वैद्यकीय अधिकाऱ्याची प्राथमिक आरोग्य केंद्राला दांडी.....


आरोग्य सेविका चालवतात प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार......


#breaking_news सुरजागड लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ८ ट्रकांची संतप्त नागरिकांनी केली जाळपोळ.....

  विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी  


सावळी सदोबा-आर्णि तालुक्यातील सावळी सदोबा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे रुग्णावर वेळेवर आरोग्य सुविधा मिळत नसल्याची ओरड रुग्णांकडून ऐकण्यात येत आहे, या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत दोन्ही वैद्यकीय अधिकारी सातत्याने अनउपस्थित राहत असून,आरोग्य सेविका व परिचारकच रुग्णालयाचा कारभार पाहत असल्याची चर्चा परिसरामध्ये जोर धरत आहे,या ठिकाणी रुग्णांची गेल्या महिन्याभरापासून हेळसांड होत आहे, तालुक्यातील सर्वात मोठे व सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या सावळी सदोबा प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातून अनेक गावातुन गोरगरीब रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात, 

#breaking_news सुरजागड लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ८ ट्रकांची संतप्त नागरिकांनी केली जाळपोळ.....

 त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रात सतत रुग्णांची वर्दळ असते,मागील पंधरा दिवसापासून,परिसरात ताप,सर्दी खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढली आहे,रुग्ण दवाखान्यात उपचारासाठी आल्यास,तेथील दोन्ही कार्यरत वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याचे दिसून येते, त्यामुळे रुग्णांना उपचाराविनाच परतावे लागत असून, खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे लागत असल्याने गरीब रुग्णांना आर्थिक उदंड सहन करावा लागत आहे,आरोग्य सेविका,लॅब टेक्निशियन,परिचारक कर्मचारी आरोग्य केंद्र सांभाळताना दिसत आहे, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता मी वैयक्तिक कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी गेलो असल्याचे सांगण्यात आले.

Previous Post Next Post