Top News

Massive protests by Nationalist Congress Party (NCP) against the central government and the state government for the removal of Railway Maldhakka and the protection of the environment.

रेल्वे मालधक्का हटाव पर्यावरण बचाव तसेच केंद्र शासनाचे व राज्य शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे भव्य निदर्शने......


     


 विदर्भ माझा न्युज 24 - मुल 


 सुरजागड येथील लोहखनिज प्रकल्पातील कच्चा लोहा देशात इतरत्र पाठवण्यासाठी मूल येथील रेल्वे स्थानकातील डम्पिंग यार्डचा वापर होणार आहे. कच्चा माल डम्पिंग यार्ड मध्ये साठवण्यासाठी सुरजागड लोह प्रकल्पामधून दररोज ७०० ते ८00  ट्रक मुल शहरात येणार आहे. कच्चा माल मुल येथून रेल्वेने बाहेर पाठवण्यात येणार आहे.  डम्पिंग यार्डचा साईडला एक मोठे मैदान असून या मैदानात शहरातील सर्वच नागरिक मॉर्निंग वॉकला जात असतात. 

https://youtu.be/9xhzrQW464M

या डम्पिंग यार्ड मुळे शहरात प्रचंड प्रदूषण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल त्यामुळे हा डंपिंग यार्ड शहरा बाहेर इतरत्र हलवावा किंवा मालधक्याचे काम तात्काळ बंद करावे या मागणीसाठी मुल राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे गांधी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. 

https://youtu.be/9xhzrQW464M

तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना  महबूब शेख अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी महाराष्ट्र, नितीन भटारकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, सुमित समर्थ अध्यक्ष बल्हारशाह विधानसभा क्षेत्र, भास्कर खोब्रागडे मुल शहराध्यक्ष, महेश जेंगठे मुल राष्ट्रवादी कार्याध्यक्ष, किसनराव वासाडे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, मुल शहर महिला अध्यक्ष अर्चना चावरे, व इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post