Top News

On the orders of District Guardian Minister and Forest, Forest and Culture Minister Sudhir Mungantiwar, the closed bus service was resumed in Dhaba Tohgaon area.

जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच वन,मस्य व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आदेशावरून धाबा तोहगाव क्षेत्रातील बंद असलेला बस सेवा पूर्ववत सूरू......

 



  विदर्भ माझा न्युज 24 - गोंडपिपरी  


              धाबा-तोहगाव जि प क्षेत्र अंतर्गत अतिवृष्टीत क्षतिग्रस्त भागाची पाहणीसाठी गेलेल्या माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांना कार्यकर्त्यांकडून बसची सेवा बंद असल्याने विद्यार्थी तसेच नागरीकांना  भोगाव लागत असलेले अडचणी सांगीतले.

लगेच बोडलावार यांच्याकडून मंत्री सुधीर मुनगंटीवार, तसेच संबधीत विभागास 22-08-22 ला लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले,02-09-22 लेखी पाठपूरावा करण्यात आले.

          सूधीर मुनगंटीवार यांनी संबंधित विभागास  भ्रमणध्वनीवर सूचना केले व त्वरीत बस सेवा सुरू करण्याचे आदेश दिले. आघाडी सरकारचे पालकमंत्री,खासदार, आमदार असतांना बंद झालेली बस सेवा आता  सूधीर मुनगंटीवार  यांचा आदेशाने सुरू होणार, सोशल मिडीयावरील ही बातमी न पचल्यांने विरोधकांचे डोळे उघडले व श्रेय लाटण्यासाठी हालचाली सूरू झाले.

          अमर बोडलावार यांच्या प्रयत्नातून व मा सूधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्यातून नादुरूस्त रस्त्याची अडचण दूर करून बससेवा पूर्ववत सूरू करण्यात विलंब झालेला एस टि बस पून्हा 28-09-22 पासून जनतेच्या सेवेत हजर करण्यात अमर बोडलावार यांना यश मिळाले.

Previous Post Next Post