Top News

विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न.....

विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न.....





विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह


शहरातील विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक येथील रुचिका बहुद्देशीय सामाजिक संस्था बल्हारशाह व झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्हारशाह तर्फे दरवर्षी प्रमाणे 26 जानेवारी व 15ऑगस्ट ला विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक येथील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात येते त्यांच प्रमाणे या वर्षी सुद्धा आज दिनांक 15 ऑगस्ट 2022 ला विवेकानंद वार्ड झाशी चौक येथे रुचिका बहुद्देशीय सामाजिक संस्था बल्हारशाह व झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्हारशाह तर्फे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


 या वेळी झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्हारशाह चे वरिष्ठ सल्लागार बाबुराव अलोने यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले या वेळी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रुचिका बहुद्देशीय सामाजिक संस्था बल्हारशाह चे अध्यक्ष सुमन कळसकर ,झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्हारशाह चे अध्यक्ष व मानवाधिकार साहयता संघ बल्हारशाह चे तालुका अध्यक्ष रोहन जयंत कळसकर , जेष्ठ वरिष्ठ सल्लागार अशोक मेश्राम ,गोंविदा वनकर  हे उपस्थित होते.

यावेळी या कार्यक्रमाला यशस्वी साठी दिपक वराडे,रतन कवलकर,सतिश वनकर, शरद पिंदुरकर , स्नेहल बटघरे, कपिल कळसकर ,पुरुषोत्तम कळसकर, प्रविण वनकर महिला मंडळ चे शाहीन शेख ,लिला कळसकर हे उपस्थित होते  या कार्यक्रमाचे आयोजन झाशी राणी सांस्कृतिक मंडळ चे अध्यक्ष व मानवाधिकार साहयता संघ बल्हारशाह चे तालुका अध्यक्ष रोहन कळसकर ,झाशी राणी सांस्कृतिक मंडळ चे मुख्य संयोजक आतिक  शेख यांनी केले आणि  या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी रिशिपाल गहलोत, शेख रेहान शेख चांद ,शरद पिंदुरकर,ज्ञानेश्वर कोपत्तपलीवार ,प्रविण वनकर, कपिल कळसकर, प्रणिल नवघरे यांनी एक दिवस आधीच भर पावसात खरी मेहनत  घेतली होती.

Previous Post Next Post