अतिवृष्टी मुळे नुकसानग्रस्तांना मिळाला भाजपा यूवक पदाधिकाऱ्यांकडून आधार
विदर्भ माझा न्युज 24 - गोंडपिपरी
यंदाचा अती पावसामुळे जनतेला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.गोरगरीब जनता निसर्गाचा प्रकोपाचे शिकार होत आहे. दिवसागणिक न ओसरणाऱ्या पावसामूळे अनेकांचे छत्र नाहीसे होत आहे.
सततचा पावसामूळे गोंडपिपरी तालुक्यातील फूलोराहेट्टी,व भंगाराम तळोधीतील मारोती रामदास फुलझेले,लच्चय्या अप्पनवार,रघुनाथ गेडाम,कल्पना बंडू वेलादी,पर्वताबाई शंकर वेलादी,निखिल शेडमके ,सागर एकनाथ गेडाम,सतीश पिल्ललवार,मंदाबाई सुरेश सिडाम, यांचे घर पडलेले आहेत या कूटूंबासाठी माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांनी आधार बनून त्यांचा घरांची पाहणी केली. व त्यांचा कूट॔बासाठी अन्न-धान्य किट दिले तसेच शासनाकडून मदत मिळवून देण्याबाबत आश्वासन दिले.वेळेवर संकट परिस्थितीत मदत केल्याबद्दल त्यांनी अमर बोडलावार यांचे आभार मानले.
त्यावेळेस तिथे भंगाराम तळोधीचे सरपंच सौ लक्ष्मी सोमेश्वर बालूगवार ,उपसरपंच सूनिल घाबर्डे,ग्रा पं.सदस्या सौ गीता बूर्रीवार, सौ ममता कोवे,माजी सरपंच सौ माधुरी गेडाम, माजी उपसरपंच मारोती अम्मावार, प्रकाश चौधरी, कमलेश गेडाम, सत्यवान मडावी, प्रशांत कळाबे,भारत वेलादि, अजय मेश्राम,गणेश भारशंकर, विश्वनाथ डोंगरे व गावकरी उपस्थित होते.


