Top News

माणसाला माणूसकी शिकवणारे मित्र जपा- युवासेनेचे प्रा.निलेश बेलखेडे......

माणसाला माणूसकी शिकवणारे मित्र जपा- युवासेनेचे प्रा.निलेश बेलखेडे......


मैत्री दिनानिमित्त  अस्पायर इंस्टीट्यूट आयोजित युवा संवाद, स्नेहमिलन कार्यक्रमात  मार्गदर्शन.....




विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)



   अस्पायर कोंचिग इंस्टीट्यूट च्या वतीने नुकतेच एका युवा संवाद , स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात विशेष मार्गदर्शक म्हणून  युवासेनेचे प्रा निलेश बेलखेडे यांची उपस्थिती होती. यावेळी युवक युवती विद्यार्थ्यांना भविष्यात  शालेय, महाविद्यालयीन शिक्षण घेत  सामाजिक जिवनात कसं जगायचं,आपले  समाजाप्रती कर्तव्य कसे पार पाडायचे, मित्र मैत्रिण या नात्याची पवित्रता समजवून सांगतांना त्यापलीकडे हि आपल ध्येय, उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नशील राहा असा संदेश यावेळी प्रा. निलेश बेलखेडे यांनी दिला. यावेळी संचालक श्रीकांत  सर यांनी  प्रा निलेश बेलखेडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच मान्यवरांच्या हस्ते प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा यावेळी करण्यात आला. कार्यक्रमात विविध प्राध्यापक वर्गांनी आपले  शालेय जिवनातील अनुभव व्यक्त करीत मैत्री दिनाचे महत्त्व सांगितले व विद्यार्थ्यांना भावी जिवनाकरिता शुभेच्छा दिल्या.या संवाद कार्यक्रमात शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग होता..

Previous Post Next Post