Top News

बल्हारशाह शहरात जिल्ह्यात प्रथमच आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवस निमित्त अनोखा शैक्षणिक उपक्रम....

बल्हारशाह शहरात जिल्ह्यात प्रथमच आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवस निमित्त अनोखा शैक्षणिक उपक्रम....


विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह

बल्हारशाह विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवस निमित संपूर्ण जिल्ह्यात विविध सामाजिक शैक्षणिक धार्मिक व आरोग्य उपक्रम भारतीय जनता पार्टी तसेच सुधीर मुनगंटीवार यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्त्यांच्या वतीने राबविण्यात आला. 


यातच चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात बल्हारशाह शहरात ३० जुलै रोज शनिवार ला सुभाष टॉकीज हॉल बल्हारशाह येथे शालेय विद्यार्थ्यांकरिता भव्य तारामंडळ प्रदर्शनी आयोजित करण्यात आली. 


या तारामंडळ प्रदर्शनी चा चंदनसिंह चंदेल माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत व  हरीश शर्मा माजी नगराध्यक्ष नगरपरिषद बल्हारशाह यांच्या अध्यक्षतेत ढोल ताशे वाजवून स्वागत करून शुभारंभ झाला. कार्यक्रमाचे आयोजन इंजि.देवेंद्र वाटकर, किशोर मोहुर्ले, सौ.सीमा वाटकर, सौ.जयश्री मोहुर्ले यांनी केले.


सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांकरिता नेहमीच नवीन नवीन उपक्रम मोठ्या स्तरावर राबविले असून त्यातून विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य कसे घडतील याकडे विशेष लक्ष दिले आहे. 

यालाच अनुसरून 30 जुलैला मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण जिल्ह्यात प्रथमच तारामंडळ प्रदर्शनी एक नवीन शैक्षणिक उपक्रम आयोजकांच्या वतीने राबवून यातून असंख्य विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जीवनात पुन्हा भर पडेल याकडे एक पाऊल टाकण्यात आला.


 शहरातील असंख्य विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन  सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रति वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छांचा वर्षाव केला.


याप्रसंगी चंदनसीह चंदेल व  हरीश शर्मा यांनी आपल्या देशाचे भविष्य असणारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या भविष्याकरिता एक नवीन दिशा दाखविली.

प्रदर्शनीच प्रस्तुतीकरण ब्लूस्टार प्लॅनेटोरियम नागपूर जयप्रकाश मौर्य यांच्यावतीने करण्यात आले व कसलाही शुल्क घेण्यात नाही आला. ५० मिनिटांचा एक शो असून हा शो झाल्यावर प्रश्नावली घेण्यात आली आणि प्रश्नावलीत उत्तर देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना बक्षीस पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

 शहरातील अनेक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी या स्तुत्य उपक्रमाचा स्वागत केले आहे.भविष्यात देखील असे स्तुत्य उपक्रम सुधीर  मुनगंटीवार यांच्या वाढदिवस निमित्त किंवा माध्यमातून शहरात राबविल्या जाणार असे मत व्यक्त केल आहे.


याप्रसंगी मंचावर भाजपा शहराध्यक्ष काशिनाथ सिंह, ज्येष्ठ नेते शिवचंद दिवेदी, समिर केने, श्रीनिवास सूंचुवार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष  आशिष देवतळे, भाजयुमो शहर अध्यक्ष रनंजय सिंह,महिला आघाडी अध्यक्ष वैशाली जोशी,महामंत्री वर्षा सुंचुवार, कांता ढोके,माजी नगरसेविका जयश्री मोहुर्ले, सुवर्णा भटारकर,पुनम मोडक, माजी नगरसेवक  येल्लय्या दासरफ, महेन्द्र ढोके, अमन चंदेल, सिमा वाटकर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता राजु दासरवार, भास्कर पेंदोर, नरेश डोंगरे, आशिष चावला, विशाल शर्मा, ऋषिपाल गेहलोत, प्रगती गेहलोत, अब्दुल आबिद शेख, अझहर रिझवी, राहुल येवले, कार्तिक रामटेके, प्रकाश गजपुरे, संकेत चौधरी, रोहित चुटे, आमिर शेख,रॉबिन यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन इंजि. देवेंद्र वाटकर व किशोर मोहुर्ले यांनी केले.

Previous Post Next Post