बल्हारशाह शहरातील टेकडी विभागात घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू....
पती व मुलगी गंभीर जखमी...
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
बल्हारशाह शहरातील टेकडी विभागात मौलाना आजाद वॉर्डातील रहिवासी असलेल्या योगेश पुनेकर यांच्या घराची भींत रात्री 11:45 वाजता दरम्यान कोसळल्याने पुणेकर कुटुंबीयांवर दुखाचे डोंगर कोसळले आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की टेकडी विभागातील मौलाना आझाद वार्ड रहीवाशी विनिता योगेश पुणेकर वय-36 वर्षे आपल्या कुटुंबासह घरी झोपी गेल्या असता काल 31 जूलैची रात्र त्यांच्यासाठी काळरात्र ठरली काल रात्री 11:45 वाजताच्या दरम्यान त्यांच्या घराची भिंत कोसळून विनिताचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला तर त्यांचे पती योगेश पुणेकर, वय-39 व मुलगी सोनू पुणेकर वय-11 वर्षे या गंभीर जखमी झाल्याचे वृत्त असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय बल्हारशाह येथे उपचार सुरू आहेत या घटनेचे वृत्त बल्हारशाह पोलिसांना कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून बल्हारशाह तहसील कार्यालयाचे संघही घटनास्थळी दाखल झाले पुढील तपास सुरू आहे.
