मुसळधार पावसामुळे व पुरा मुळे बल्लारशाह शहरातील नुकसान ग्रसतांना तात्काळ सर्वेक्षन करून मदत साहीत्य उपलब्ध करून दद्या - भाजपा,बल्लारशाह
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह
राज्यात संततधार सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांचे हाल बे हाल झाले आहेत,शेतकर्यांना ही मोठ्या प्रमानात नुकसानाचा सामना करावा लागत आहे,या मुसळधार पावसामुळे व्यापारी वर्गाला ही याचा फटका सोसावा लागला आहे,
या संतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे बल्लारशाह तालुक्यालाही फटका बसला आहे तालुक्यात पुर परीस्थीती उधभवली आसुन अनेक गावात पाणी शिरले असुन अनेक नाले तुंब भरले आहेत,तर तालूक्यात 40 घरपडल्याची ही माहीती बल्लारशाह तहसीलदार यांच्या कडुण प्राप्त झाली आहे,
मुसळधार पावसामुळे उदभवलेलल्या पुरपरीस्थी मुळे बल्लारशाह शहरातील वस्ती विभागा सह काही प्रभागातील घरांमध्ये पाणी शिरले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,
तर बल्लारशाह विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार भाजप चे जेष्ठ नेते चंदनसींह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप चे माजी जिल्हाअध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष हरीष शर्मा यांच्या प्रमुख उपस्थीतीत बल्लारशाह तहसीलदार यांना निवेदण देण्यात आले,
सदर निवेदणात बल्लारशाह शहरातील ज्याभागांत पाणी व पुरा मुळे नुकसान झाले आहे त्या ठीकानांची पाहनी करून पंचनामा करून ज्यांच्या घराचे नुकसान झाले आहे त्यांना मदत साहित्य तात्काळ सर्वेक्षण करून उपलब्ध करून देण्याचे निवेदन आज भारतीय जनता पार्टी बल्लारशाहच्या वतीने देण्यात आले.
यावेळी माजी जिल्हाअध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांचा सह ,निलेश खरबडे,आशीष देवतळे,काशीशाथ सींह मोहित डांगोरे, देवेंद्र वाटकर, विकास दुपारे, निखिल निंदेकर, राजकुमार श्रीवास्तव,गणेश कुंडे, पंकज गिडवाणी, इत्यादी असंख्य भाजप नेते, माजी नगरसेवक/माजी नगरसेविका, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
