Top News

आम आदमी पार्टीच्या "जल त्याग आंदोलनाची" जीवन प्राधिकरण (MJP) विभागाने घेतली दखल......

आम आदमी पार्टीच्या "जल त्याग आंदोलनाची" जीवन प्राधिकरण (MJP) विभागाने घेतली दखल......


शहरातील समस्येवर युद्धपातळीवर काम सुरु.....


 

विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह

    आम आदमी पक्षाने दिनांक 17  जून 2022  ला एक दिवसीय "जल त्याग धरणा आंदोलन" केले व त्या आंदोलना मधून शहरातील जनतेला होत असलेल्या 'पाण्याच्या समस्या' बद्दल,  प्राधिकरणाच्या त्रुटी युक्त  सेवेबद्दल,  पाठविल्या जाणाऱ्या भरमसाठ बिलाबद्दल, शहरातील विविध ठिकाणी फुटून असलेल्या पाईप लाईन बद्दल, तसेच मनमानी बिल, स्वच्छ पानी आणि शहरात टाकल्या जात असलेल्या नवीन पाईप लाईन च्या समस्येबद्दल आंदोलना मार्फत (MJP) बल्लारशाह पानी पुरवठा विभागाचे अधिकाऱ्यां ची कान उघडणी करण्यात आली व समस्येचे निराकरण करण्याबद्दल अंतिम 'विनंती व चेतावणी' देण्यात आली, सदर "आप" बल्लारशाहचे सयोंजक रविकुमार पुप्पलवार, सह संयोजक अफज़ल अली, महिला संयोजिका अलकताई वेले, महिला सह संयोजिका सलमानताई सिद्दीकी, महिला संघठन मंत्री सरिताताई गुजर यानी एक दिवस "जल त्याग" करून धरणा आंदोनलाला यशस्वी केले, आता आंदोलन होताच 'पाणी पुरवठा विभाग बल्लारशाह' ( MJP) विभागामार्फत 'आम आदमी पक्षाचा' मार्फत ज्या-ज्या समस्या सांगण्यात आल्या होत्या त्या-त्या समस्यांचे दखल घेत जीवन प्राधिकरण विभाग हे कामाला लागल्याचे शहरातील विविध भागात दिसून येत आहे.





Previous Post Next Post