Top News

पावसामुळे रोगराई वाढत असल्यामुळे रोग प्रतिबंधक निवारण त्वरीत करावे - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,बल्लारशाह

पावसामुळे रोगराई वाढत असल्यामुळे रोग प्रतिबंधक निवारण त्वरीत करावे - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,बल्लारशाह



विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह 

  पावसामुळे संपूर्ण बल्लारशाह शहरात डेंग्यू मच्छरांचा प्रकोप वाढत असतांना या स्थितीत शहरात काही ठिकाणी अद्याप पावेतो नाल्यांची गटरची साफसफाई पूर्णपणे झालेली नाही. काही ठिकाणी पावसाचे पाणी साचलेले असून तेथे जनावरांचा हैदोस असून परिसरात घाणीचे साम्राज्य वाढलेले आहे. 

त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. तरी संपूर्ण शहरात डेंग्यू, मलेरिया रोग प्रतिबंधक निवारण करण्यास घरोघरी, नाल्या,बोळ्यामध्ये डिटीटी फवारणी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बल्लारशाह शहर पक्षाकडून करण्यात आली. व याचे लवकर निवारण करावे अशे निवेदन करण्यात आले.

    हे निवेदन देतांना उपस्थित बल्लारशाह शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कार्याध्यक्ष इंजि.राकेश सोमानी, उपाध्यक्ष आरिफ खान, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य सुमित(गोलू)डोहणे, अंकीत निवलकर उपस्थित होते.

Previous Post Next Post