वसंतराव नाईक यंग फाउंडेशन तर्फे हरितक्रांतीचे जनक, प्रगतीशील शेतकरी तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी.....
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक, प्रगतीशील शेतकरी तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांचा जयंतीदिन संपूर्ण राज्यात कृषी_दिन म्हणून साजरा केला जातो.
शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आशीर्वादाने राज्यात महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो सलग अकरा वर्ष मुख्यमंत्रीपदी रुजू होण्याचे मान हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गवासी वसंतराव नाईक साहेब यांना राजनैतिक संबंध सलोख्याची राहतील अशी अपेक्षा आपल्या मनी बाळगून वसंतराव नाईक साहेबांनी महाराष्ट्राची धुरा सांभाळली होती माझ्या भारताला व माझ्या महाराष्ट्राला सुखी व समृद्धी केल्याशिवाय गप्प बसणार नाही असे उद्गार देणारे दिवंगत कैलासवासी वसंतरावजी नाईक यांनी हे सगळं करून दाखवले अशा महामानवाला कोटी कोटी प्रणाम काल १जुलै सावळी सदोबा येथे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश डोमाजी राठोड, मिरासे काका, सुरेश पवार, दिलीप राठोड,नुनेश आडे, दिग्विजय शिंदे, दुर्गेश करनेवार,आशिफ खान,मुबारक, मिलिंद चव्हाण,सुनील राठोड,रोहित राठोड, सुरेश राठोड, पत्रकार अविनाश चव्हाण,अविनाश जाधव, कबीर,किशोर व समस्त वसंतराव नाईक यंग फाउंडेशन चे संपूर्ण सदस्य उपस्थित होते.
