कपिल ईद्दे यांची विराआंस युवा आघाडीच्या पूर्व विदर्भ अध्यक्ष पदी पदोन्नती....तर सुदाम राठोड यांची चंद्रपूर विभागीय अध्यक्ष पदी पदोन्नती...
विराआंस युवा आघाडीची विदर्भ स्तरीय राज्य कार्यकारणीची बैठक मुख्यालयाला संपन्न......
विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर
विदर्भ मिळवू औंदा या एककलमी कार्यक्रमा अंतर्गत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीची विदर्भ स्तरीय राज्य कार्यकारणीची बैठक आज दि १७/०६/२०२२ ला विराआंस मुख्यालय गिरीपेठ येथे पार पडली या बैठकीला अध्यक्ष म्हणून महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती . रंजना मामर्डे उपस्थित होत्या येणाऱ्या काळात युवकांची भागीदारी /सहयोग याबाबत चर्चा करण्यात आली. वेगळा विदर्भ ही काळाची गरज आहे व विदर्भ आंदोलनात युवकांची भूमिका ठरवणे तेवढेच संयुक्तिक आहे म्हणून विदर्भातील तरुणांनी आपली भूमिका आंदोलना बाबत स्पष्ट करावी यावर चर्चा करण्यात आली . विराआंस युवा आघाडीचा गावा गावा पर्यंत विस्तार झाला पाहिजे त्याकरीता जिल्हा /तालुका/प्रभाग/वॉर्ड / गावात बांधणी बाबत चर्चा करण्यात आली .
युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आता गावा गावात लोकांमध्ये जनजागरण करावे असा निर्णय घेण्यात आला. विदर्भात मोठ्या प्रमाणे बेरोजगारी, नक्सलवाद ,पलायन, कुपोषण सारख्या अनेक समस्यांनी विदर्भातील तरुण ग्रसित आहेत. म्हणून ह्या समस्यांतून त्यांना बाहेर काढण्याकरीता विराआंस चे पदधिकारी कार्य करणार असल्याचे ठरले. विदर्भ आंदोलनाची धुरा युवकांनीच पुढाकार घेऊन सांभाळावी व युवका द्वारे आता रस्त्याचे आंदोलन तेज करण्याचे ठरले.
या बैठकीला विदर्भ प्रदेश युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी संबोधित करताना सांगितले की तेलंगणाप्रमाणे आंदोलनात युवकांनी उतरावे आता घरी बसून युवकांनी विदर्भ मिळणार असे स्वप्न न पाहता प्रत्यक्षात आंदोलनात सहभाग घेतला पाहिजे व मिशन २०२३ विदर्भ राज्य अंतर्गत स्वतःला वाहून दिलं पाहिजे तेव्हाच तरुण आपल्या स्वप्नांचा विदर्भ राज्य निर्माण करू शकते आणि देशात जेव्हा केव्हा क्रांती झाली आहे ती तरुणांनीच केली आहे म्हणून भगत सिंग यांचा आदर्श पुढे ठेवून स्वातंत्र्याच्या या चळवळीत उतरावे असे आव्हाहन केले.
या बैठकीचे अध्यक्षा रंजना मामर्डे यांनी युवकांना संबोधित करताना सांगितले की आता युवकांनीच आंदोलनात सहभाग घेतला पाहिजे कारण वरिष्ठ नेत्यांची वय झाल्याने व त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने आंदोलनाला धावत्या युवकांची गरज आहे म्हणून युवकांनी मोठ्या संख्येत विदर्भ आंदोलनात सहभागी व्हावेत असे आवाहन युवकांना केले.
या बैठकीमध्ये पूर्व विदर्भाचे अध्यक्ष अरुण केदार, युवा आघाडी विदर्भ प्रदेश महासचिव मीतीन भागवत, पूर्व विदर्भाचे अध्यक्ष कपिल ईद्दे, मोहाडी तालुका युवा अध्यक्ष ऍड राकेश सिंदेगणसूर , हिंगणा तालुका युवा अध्यक्ष ऍड . विनोद बोदाडे, नागपूर जिल्हा युवती आघाडी अध्यक्षा श्वेता सिरस्कर, चंद्रपूर युवा आघाडी अध्यक्ष सुदाम राठोड, वरुड विभाग युवा आघाडी अध्यक्ष गणेश कुसराम, अशोक पटले , ऍड . दीपक चटप, विशाल चौधरी , श्याम लुटे, वैभव अडवे, स्वप्नील धवणे , संजय चौधरी, संतोष खोडे, किशोर कुंजेकर यांची भाषणे झाली.
बैठकीत कपिल ईद्दे यांची पदोन्नती करत पूर्व विदर्भ युवा आघाडी अध्यक्ष, सुदाम राठोड याना चंद्रपूर विभाग युवा आघाडी अध्यक्ष , प्रशांत मुळे यांना नागपूर शहर युवा आघाडी अध्यक्ष, अशोक पटले यांना तिरोडा-गोरेगाव विधानसभा अध्यक्ष युवा आघाडी म्हणून नियुक्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच विशाल चौधरी यांना नागपूर शहर युवा आघाडी उपाध्यक्ष, स्वप्नील धवणे वरोरा तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष, मनीष सूर्यवंशी यांना यवतमाळ ज़िल्हा युवा आघाडी उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले.
या बैठकीला सोशल मीडिया आघाडीचे वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष पंकज साबळे, चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष विशाल राठोड, ऋषी चटप, सागर सोनकुसरे, प्रफुल्ल पौनीकर, मनीष किनाके, शेख जुनैद, नियाज अहमद मलिक, संघरत्न गेडाम, गौरव तायवाडे, सुरज जीवतोडे, वैभव अडवे, भूषण कडू, शुभम मोहनकार, अजिंक्य मांडवकर, श्रीपाद शिरस्कर, उमेश निनावे, गुलाबराव धांडे, गणेश शर्मा यांसह आदी तरुण बैठकीला उपस्थित होते.





