Top News

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ...कसा चालेल मंडळाचा कारभार - विदर्भवादी कवि वसंत गवळी, गोंदिया,विदर्भ

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ...कसा चालेल मंडळाचा कारभार  - विदर्भवादी कवि वसंत गवळी, गोंदिया,विदर्भ




विदर्भ माझा न्युज 24 - गोंदिया


अकरा हजार पंचेचाळीस 

पैकी रीक्त पदे सहा हजार 

कसा चालेल मंडळाचा कारभार 

कुशल नाहीत विदर्भ बेरोजगार 

पण नियतीतच आहे तफावत फार 


पाणी म्हणजे जिवन शेतक-यांचे पोषण 

त्यातच खोडा करून चालू आहे शोषण 

संपूर्ण विदर्भ विरोधी शाशन व प्रशासन 

राजकीय नेते चापलुशीने पक्के करतात आपले आसन 


फक्त एका महामंडळाची स्थिती 

कीती व्यक्त करावी दुःखद परिस्थिती 

विदर्भातील युवक बेरोजगार कां खातो माती?

बंडाचा झेंडा का बरं घेत नाही आपल्या हाती 


स्वयं व्हा प्रकाशित स्वकर्तृत्वाने

मातृभुमीकरिता पेटून उठा जरा त्वेषाने

मालगुजारी तलाव केले नेस्तनाबूत

पाण्याअभावी तडफडत आहेत गरीब बीचारे खेडूत


आता तरी जागा हो वैदर्भिय मर्दा 

जुल्मी राजवट व्यवस्थेचा कर तू खुर्दा

राष्ट्रसंत तुकडोजीची शिकवण अंगी बाणा 

मशाल क्रांतीची मीत्रांनो घराघरात आणा


:- विदर्भवादी कवि वसंत गवळी,गोंदिया,विदर्भ




Previous Post Next Post