मोठी बातमी! शाळेत माथेफिरुचा अंदाधुंद गोळीबार !
18 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू......
विदर्भ माझा न्युज 24 -
अमेरिकेतील टेक्सासमधील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका माथेफिरुने केलेल्या अंदाधूंद गोळीबारात 18 शाळकरी मुलांसह 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहीती समोर आली आहे. मृतांमध्ये 3 शिक्षकांचा समावेश आहे. मिथेफिरुच्या हल्ल्यात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
#US_Firing
अमेरिकेतील टेक्सास मधील रॉब एलिमेंटरी स्कूल मध्ये एका माथेफिरुने अंदाधुद गोळीबार केला.
#Firing_in_School
त्यात शाळेतील 18 विद्यार्थी आणि 3 शिक्षक असे एकूण 21 जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी असल्याची माहिती, टेक्सासच्या राज्यपालांनी दिली आहे. हल्लेखोर 18 वर्षीय असून त्याने या हल्लानंतर स्वत:वर गोळी झाडून घेतल्याचे समजते. सल्वाडोर रामोस अशी हल्लाखोराची ओळख पटली आहे.
