गडचीरोलीत नक्षवाद्यांच्या आत्मसमर्पणाने नक्षल चळवळीला मोठा धक्का.....
12 लाख रूपये ईनामी असलेल्या 2 जहाल नक्षलवाद्यांचे गडचीरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण......
विदर्भ माझा न्युज 24 - गडचीरोली
सविस्तर वृत्त असे आहे की, नक्षलवादी नामे रामसिंग ऊर्फ सिताराम बक्का आत्राम, वय 63 वर्ष रा. अर्कापल्ली ता. अहेरी जि. गडचिरोली व माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन राजु मट्टामी वय 34 वर्ष रा. गट्टेपल्ली पोमके हालेवारा ता. एटापल्ली जि. गडचिरोली या दोन जहाल नक्षलवाद्यांनी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या समोर आत्मसमर्पण करून नवजीवनाला सुरुवात केली आहे.
रामसिंग ऊर्फ सिताराम बक्का आत्राम हा 2012 ते मार्च 2022 पर्यंत भामरागड एरीया टेक्नीकल दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. रामसिंगवर 1 खून, 1 चकमक आणि इतर 1 असे एकूण 3 गुन्हे दाखल आहेत. रामसिंग हा मौजा कासमपल्ली, गुंडुरवाही, हीकेर, आशा-नैनगुडा, आलदंडी येथील चकमकीत सहभागी होता.
माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन राजु मट्टामी ही फेब्रुवारी 2013 ते एप्रिल 2022 पर्यंत पेरमिली दलामध्ये एसीएम पदावर कार्यरत होती. माधुरीवर 4 खून, 21 चकमक, 7 जाळपोळ आणि इतर 5 असे एकूण 37 गुन्हे दाखल आहेत. ती मौजा वेळमागड, कसनासुर व माडवेली चकमकीमध्ये सहभागी होती. महाराष्ट्र शासनाने रामसिंग ऊर्फ सिताराम आत्राम याच्यावर 6 लाख रुपयांचं तर माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन मट्टामीवर 6 लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते. या दोघांच्या आत्मसमर्पणाने नक्षली चळवळीला हादरा बसला आहे.
सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2019 ते 2022 सालामध्ये आतापर्यंत एकुण 49 जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले असल्याची माहीती गडचीरोली जिल्हा पोलिसांनी दिल्ली आहे.


