पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडेंच्या जाळ्यात अडकला धर्मवीर चा मुख्य मारेकरी.....
विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)
चंद्रपूर शहरातील बल्लारशाह बायपास रोडवर असलेल्या अष्टभुजा वार्डात एका 20 वर्षीय धर्मवीर यादव या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना आज 25 में रोजी सकाळी ६:०० वाजता च्या सुमारास उघडकीस आली होती.
अष्ठभुजा वार्डात 20 वर्षीय धर्मवीर उर्फ डबल्या अशोक यादव या युवकाची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली होती.
रामनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहचत तपास सुरू केला, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना सदर प्रकरणाचा तपास सोपविला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात हत्या २४ में च्या रात्री १०:३० ते ११:०० वाजताच्या दरम्यान झाला असल्याची माहिती पुढे आली.
धर्मवीर चे अष्टभुजा वार्डात एकाशी वाद असल्याची माहिती होती स्थानिक गुन्हे शाखेने याबाबत अधिक माहिती गोळा केल्यावर या मध्ये चेतन सोनवणे याच्या 2 साथीदारांनी रात्रीच्या सुमारास धर्मवीर सोबत वाद घालत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केला.
या हल्ल्यात धर्मवीर चा जागीच मृत्यू झाला, नेमका वाद काय होता याबाबत अध्यापही माहिती मिळाली नाही, मुख्य आरोपी हा गुन्हेगारी वृत्तीचा असल्याची माहिती आहे, मृतक धर्मवीर याचेवर 2 हत्येचे गुन्हे दाखल होते.
मुख्य आरोपी चेतन सोनवणे याला मोरवा विमानतळ परिसरातून ताब्यात घेतले असून दुसरा आरोपी रामनगर पोलिसांच्या ताब्यात आहे.
हत्या प्रकरणातील 2 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून 1 आरोपी सध्या फरार असुन त्याचा शोध सुरु आहे.
हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पकडण्याची यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, संजय आतकुलवार, दीपक डोंगरे, प्रांजल झिलपे, गणेश भोयर, चंद्रशेखर आसुटकर यांनी पार पाडली.
