Top News

हत्ते ने हादर्ले चंद्रपुर शहर..... २० वर्षीय तुरूणाची धारधार शस्त्राने हत्या.....

हत्ते ने हादर्ले चंद्रपुर शहर..... २० वर्षीय तुरूणाची धारधार शस्त्राने हत्या.....



विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)

चंद्रपूर बल्लारशाह बायपास रोडवर असलेल्या अष्टभुजा वार्डात एका 20 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना आज बुधवार २५ में रोजी सकाळी ६:०० वाजताच्या सुमारास उघडकीस आली असुन नेमकी हत्या कशासाठी झाली याचा शोध चंद्रपूर पोलीस घेत आहेत. हत्येची घटना उघडकीस येताच चंद्रपूर शहरामध्ये खळबळ उडाली आहे.

शहरातील अष्टभुजा वार्डातील रहीवाशी 20 वर्षीय धर्मवीर उर्फ डबल्या अशोक यादव या युवकाची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही हत्या नेमकी कोणी केली आणि कशासाठी केली हे अध्यापही  उघडकीस आले नसले तरी ही,

पोलिस सुत्रानुसार, काल मंगळवारी (२४ में) ला रात्री १०:०० वाजताच्या सुमारास काही तरुणांनी धर्मवीर यादव याला फोन करून बोलाविले होते. त्यानंतर मित्रांमध्ये भांडणे झाली धर्यवीर वर चाकूने हल्ला केला. जखमी अवस्थेत धर्मवीर घटनास्थळावरून पळून गेला मात्र रमाबाई नगरीतील मंदिराजवळ त्याला गाठून  मारेकऱ्यांनी त्याची धारधार शस्त्राने हत्या केली.

आज सकाळी ६:०० वाजता  घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडून होता. सदर घटना उघडकीस येताच सदर माहिती पोलिसांना देण्यात आली. 

या प्रकरणी माहिती मिळताच शहरातील रामनगर पोलिस स्टेशन चे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन  पंचनामा केला व श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात सुद्धा घेतले असुन पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहे.

Previous Post Next Post