बल्लारशाह शहरातील शेकडो युवकांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये भव्य पक्ष प्रवेश
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह
राष्ट्रवादी काँग्रेस हा जनतेचे दुःख जाणणारा पक्ष आहे, त्यामुळे चंद्रपुर जिल्ह्यात कुठल्याही भागात मदत देण्यासाठी सर्वप्रथम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोहोचतात, शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा येथील कार्यकर्ते नेहमी तत्पर असतात.
हेच काम बल्लारशाह शहरातील वेगवेगळ्या वार्डातील शेकडो युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये पक्ष प्रवेश घेतला व यांचे कार्य बघता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या हस्ते दाणी आरक यांची राष्ट्रवादी काँग्रेस बल्लारशाह सचिव पदी यांची निवड करण्यात आली.
पक्ष पप्रवेशाचा कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती , चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य,जिल्हा महिला अध्यक्ष बेबी उईके,महासचिव राजू काब्रा, बल्लारशाह शहर अध्यक्ष बादल उराडे, कार्याध्यक्ष इंजि.राकेश सोमानी यांची होती,तसेच या कार्यक्रमात उपस्थित बल्लारशाह शहर उपाध्यक्ष आरिफ खान, बल्लारशाह विधानसभा महिला अध्यक्ष शुभांगी साठे, महिला तालुका अध्यक्ष शहजादी अन्सारी,शहर अध्यक्ष अर्चना बुटले,महासचिव माया सातपुते,महासचिव कविता बुरचुंडे,सचिव कल्पना राऊत,सचिव मलेश्वरी महेशकर,महासचिव संजय अग्रवाल,अल्पसंख्याक अध्यक्ष बल्लारशाह शहर इब्राहिम खान, ग्रामीण महासचिव इम्रान खान, सुमित(गोलू)डोहणे,राजेंद्र कौर,अंकीत निवलकर,व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

