ग्रा.पं. सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय.....
माजी आमदार निमकर यांनी केली होती मागणी ....
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याचे यश...
विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)
कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे राज्यातील १४००० ग्राम पंचायतींमधील राखीव प्रवर्गातील ग्राम पंचायत सरपंच तसेच सदस्य यांना विशेष बाब म्हणून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास पुनःश्च एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभगाने दि. १० मे २०२२ रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या मागणी संदर्भात राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी व जिल्हाधिका-यांशी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी माजी आमदार निमकर यांचेसह शिष्ट मंडळासमवेत चंद्रपूर जिल्हाधिकारी श्री. अजय गुल्हाने यांची भेट घेउन त्यांच्या मर्फतीने निवेदन सादर केले होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व प्राधान सचिव श्री मीना यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली. राजुरा येथील माजी आमदार श्री सुदर्शन निमकर यांनी या समस्येकडे आ. सुधीर मुनगंटीवार यांचे लक्ष वेधून पाठपुरावा केला होता हे विशेष.
महाराष्ट्रासह चंद्रपूर जिल्हयात ग्राम पंचायतीच्या सार्वत्रीक निवडणुका जानेवारी २०२१ च्या दरम्यान घेण्यात आल्या होत्या. या निवडणुकांचा निकाल दिनांक १८ जानेवारी २०२१ रोजी घोषीत करण्यात आला. निवडणुका आटोपताच पुन्हा कोरोनाची दुसरी लाट राज्यात सुरू झाली. त्यामुळे शासनाने कोरोनाच्या प्रतिबंधाकरिता पुन्हा कडक निर्बंध लागू केले. या कडक निर्बंधामुळे शासकीय कार्यालये बंद होती व दळणवळणाची साधने सुध्दा लॉकडाऊनमुळे बंद होती. या कालावधीत चंद्रपूर जिल्हयात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे १५६७ व्यक्ती मरण पावल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे ग्राम पंचायत सदस्यांना शासकीय कार्यालयातुन जात वैधता प्रमाणपत्राकरिता लागणारे पुरावे वेळेत मिळू न शकल्यामुळे एक वर्षाच्या मुदतीत ब-याच ग्राम पंचायत सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र दाखल करता आले नाही. ही बाब लक्षात आनून दिली व तसेच काही ग्राम पंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र उशीरा दाखल केले असता या सदस्यांना सुध्दा अपात्र करण्याबाबतच्या नोटीस जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आल्या होत्या. ग्रा. पं. सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता दाखल केलेल्या केसेस जात वैधता समितीकडे प्रलंबित असतांना तसेच काही सदस्यांनी मुदतीच्या नंतर जात वैधता प्रमाणपत्र दाखल केले असतांना अशा जवळपास १०४० च्या वर ग्रा. पं. सदस्यांना अपात्र करण्याबाबतच्या नोटीस देण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागत एकच खडबड उडाली होती. ग्रा. पं. सदस्य हे गावखेड्यातील जनतेमधून निवडून आलेले जनप्रतिनिधी आहे , यात प्रामुख्याने शेतकरी ,शेतमजूर , गरीब नागरिक आहेत .एवढया मोठया प्रमाणात सदस्यांना अपात्र केल्यास ग्राम पंचायतीच्या प्रशासनावर व पर्यायाने ग्रामविकासावर त्याचा विपरीत परिणाम होउन विशेषतः त्यांच्या हक्कावर गदा येणार असल्यामूळे व पुन्हा सार्वत्रीक निवडणुका घेणे सुध्दा प्रशासकीय दृष्टया हिताचे ठरणार नव्हते. त्यामुळे कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे राज्यातील तसेच चंद्रपूर जिल्हयातील ग्राम पंचायत सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यात एक वर्षाची मुदतवाढ देणे अत्यंत गरजेचे आहे अशी भूमिका घेउन ती आ. मुनगंटीवार यांनी शासन व प्रशासनाला पटवुन देवून सातत्त्याने पाठपुरावा केला. अत्यंत महत्वाच्या या प्रश्नाविशयी जिल्हाधिकारी चंद्रपुर अजय गुल्हाने यांनी सुद्धा सकारात्मक भुमिका घेतली होती.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने विशेष बाब म्हणून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत पुनःश्च एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील सरपंच व ग्राम पंचायत सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे चंद्रपुर जिल्ह्यासह राज्यातील 14000 हजार ग्रा.प.च्या राखीव गटातील सदस्यांना मोठा फायदा झाल्यामुळे ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रिफ आ.सुधिर मूनगंटीवार, माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजप चे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून अभिनंदन करण्यात येत आहे.

