गोसेखुर्दच्या बॅक वॉटर मुळे आठवडी बाजाराची चिंता वाढली पाण्यामुळे व्यापारांना करावा लागतो अडचणीचा सामना
विदर्भ माझा न्युज 24 - जिल्हा प्रतिनिधी,भंडारा
भंडारा तालुक्यातील पहेला या ठिकाणी आठवड्यातून रोज शुक्रवारला बाजार भरत असतो. हे गाव जिल्हा परिषद क्षेत्र चे ठिकाण असून या गावातील परिसरातील 40 ते 50 गावाचा संपर्क येत असतो. आणि अशा परिस्थितीत या गावात बाजारा करता जागा नसणे हि फार या गावा करता शोकांतिका आहे. परंतु या बाजारामध्ये गोसेखुर्द बॅक वॉटर पाणी शिरल्यामुळे व्यापारांना बसण्याकरता जागा उपलब्ध नाही .त्यामुळे व्यापारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
ठेकेदार आपली वसुली बरोबर करतात .परंतु व्यापारांना सुविधा नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आज कुठे बसावे त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे. पहेला बाजारामुळे ग्रामपंचायतला वर्षाकाठी दोन ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळत असते. त्यामुळे पहेला ग्रामपंचायत ने आठवडी बाजारा करता पर्यायी व्यवस्था करावी अशि मागणी सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे ,कुलदीप गंधे ,परिसरातील सर्वसामान्य जनता व व्यापाऱ्यांची मागणी आहे .