गोवरी चिंचोलीत शिवसेनेच्या शिबिराला उत्स्फूर्थ प्रतिसाद
नेत्राचिकित्सा आणि आरोग्य शिबिरात क्षेत्रातील 710 नागरिकांना लाभ
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
जनसेवा हीच ईश्वरसेवा या हेतूने स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या पुढाकाराने राजुरा शिवसेनेच्या वतीने गावोगावी नेत्रतपासणी आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यात सास्ती गोवरी आणि पाचगाव आर्वी क्षेत्रातील गोवरी येथे 173, कळमना येथे 130,चिंचोली येथे 124 सुमठाणा येथे 103,रामपूर 100,भेदोळा येथे 80,तर साखरवाही येथे 90 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
गोवरी हे तालुक्यातील सर्वात जास्त शिबिराचा लाभ घेणारे गाव ठरले असून यासाठी सरपंच आशा उरकुडे यांनी प्रयत्न केले.
तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून चालू असलेल्या या शिबिराला यशस्वी करण्यासाठी विधानसभेचे समन्वयक बबन उरकुडे, तालुका प्रमुख वासुदेव चापले, तालुका समन्वयक प्रदीप येनूरकर, शहर प्रमुख निलेश गंपावार,युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर,उपतालुका प्रमुख रमेश झाडे, उपतालुका प्रमुख सुधाकर मोरे, शहर समन्वयक बबलू चव्हाण यासंह अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.