Top News

लवकरच तालुका कार्यकारिणी गठीत करुन घोषित करणार - रुपेश निमसरकार

लवकरच तालुका कार्यकारिणी गठीत करुन घोषित करणार - रुपेश निमसरकार



पोंभूर्णा तालुका ऑल इंडिया पँथर सेनेची कार्यकारिणी बैठक आयोजीत




विदर्भ माझा न्युज 24 -  पोंभूर्णा 


चंद्रपूर जिल्ह्यात ऑल इंडिया पँथर सेना ताकदीने उभी होत असून तालुका शाखा विस्तारासाठी पोंभूर्णा तालुका शाखा कार्यकारिणी गठीत करुन घोषित करण्यासंबंधी दिनांक ०९.११.२०२१ मंगळवारला बाजार समिती येथे दुपारी १.०० वाजता बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा सल्लागार संतोषजी डांगे, जिल्हा मार्गदर्शक सुरेश नारनवरे, व प्रमुख अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार तर प्रमुख अथिती म्हणून जिल्हा उपाध्यक्ष त्यागीभाई देठेकर, जिल्हा युवा अध्यक्ष अजय झलके, जिल्हा युवा पँथर भैय्याजी मानकर, निशाल मेश्राम, सुमीत कांबळे आदी उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रात बौद्ध, आदिवासी व मागासवर्गीयांवर वाढते हल्ले बघता महाराष्ट्रात ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार सातत्याने मनुवादी, तालीबानी, दादागिरी व विकृत मानसिकते विरोधात संघर्ष करीत आहेत. या निच विकृतीचा खात्मा करण्यासाठी जिवाची पर्वा न करता रस्त्यावर येत आहेत. त्यांच्या संघर्षाची ठिणगी चंद्रपूर जिल्हात सुद्धा पोहचली असून जिथे जिथे अन्याय अत्याचार होत आहेत त्या विरोधात ऑल इंडिया पँथर सेना ताकदीने लढत असून न्याय मिळवून देत आहेत. 

यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात ऑल इंडिया पँथर सेनेत मोठ्या प्रमाणावर युवावर्ग समाविष्ठ होत असून आणि आंबेडकर वादी आंदोलनाचा हिस्सा होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर युवावर्ग पँथर सेनेत दाखल होण्याच्या मार्गावर असतांना तालुका कार्यकारिणी गठीत करण्यासंदर्भात व विविध विषयावर चर्चा व पुढील कार्य करण्या संबधाने बैठक आयोजित केली आहे. 

या बैठकीला तालुक्यातील  डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीवीर बीरसा मुंडा, अण्णा भाऊ साठे, व महापुरषांना ऑयडाल मानणारा युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून जाहीर केले आहे. येणाऱ्या काळात कुणाचीही दादागिरी, तालीबानी व्यवस्था चालू देणार नाही असेही स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

Previous Post Next Post