थ्रेशर मध्ये हात गेल्याने मजुराचा दबून दूर्दैवी मृत्यु...राजुरा तालुक्यातली घटना.
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
राजुरा तालुक्यातील माथरा शेतशिवारात काल दि.१७/१०/२०२१ ला सकाळी ११:०० वाजता शेतात सोयाबीन काढत असताना अचानक थ्रेशर मध्ये हात गेल्याने मजुरांचा दबून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
रामकीसन धोटे (३८) रा.माथरा असे मजुराचे नाव असून माथरा शेतशिवारात मधुकर ताजने यांच्या शेतात सोयाबीन काढत असताना अचानक थ्रेशर च्या बेल्ट मध्ये तोल गेल्याने शरीराचा अर्धा भाग थ्रेशर मध्ये गेला आणि मजुराचा जागीच मृत्यू झाला.
मृतकाच्या मागे पत्नी, एक मूलगा आणि एक मुलगी आहे. सदर घटनेची नोंद राजुरा पोलिसांनी केली आहे.