Top News

वन्यजीव सप्ताह निमीत्य बल्लारशाह वनपरिक्षेत्रा अंतर्गत भव्य रॅली चे आयोजन

वन्यजीव सप्ताह निमीत्य बल्लारशाह वनपरिक्षेत्रा अंतर्गत भव्य रॅली चे आयोजन  



विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह

बल्लारशाह दिनांक 07 ऑक्टोंबर  2021 रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे कार्यालय बल्लारशाह येथे वन्यजीव सप्ताह निमीत्य जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य व संजय रांईंचवार,तहसिलदार बल्लारशाह उपस्थित होते. तसेच पर्यावरण वाहीनी बल्लारशाह व सेव फॉरेस्ट सेव चंद्रपुर चे सदस्य, परिक्षेत्रातील संयुक्त वनव्यवनस्थापन समिती अध्यक्ष व वनकर्मचारी उपस्थित होते. 



कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्लारशाह यांनी केले लोकसहभागातूनच पर्यावरण चे संवर्धन व संरक्षण हे शक्य आहे, पर्यावरण जर सुरक्षित राहिले तर मनुष्य जीवन हे सुखी आणि समृद्ध राहील. आजच्या युगात आपण पाहतो आहे वातावरणात मोठा बदल झाला आहे व यामुळे जागतिक तापमान वाढत आहे जे नवीन नवीन संकटांना जन्म देत आहे, यासाठी कारणीभूत आपलाच मानवीय समाज आहे.



आपण सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घेऊन आपल्या पुढच्या पिढीसाठी वन आणि वन्यजीव यांचे संरक्षण व संवर्धन केलेच पाहिजे. समाजाला मोठ्या प्रमाणावर यावर जागरूक केले पाहिजे, ही आपली सर्वांची सामूहिक कर्तव्य व जवाबदारी आहे. पर्यावरण चे समतोल राखण्यासाठी वन आणि वन्यजीव हे अत्यंत प्रमुख घटक आहे, या वेळी  डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजने अंतर्गत प्रथम चरणात तालुक्यातील कळमना, मानोरा व इटोली या गावातील जंगल लगतच्या शेतकऱ्यांना वन्यजीव मुळे त्यांच्या शेतपिकांची नुकसान टाळण्यासाठी सोलार कुंपण किट च वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या मार्गदर्शनात झाले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नरेश भोवरे, प्रविण बिपटे, भगीरथ पुरी, रुंदन कातकर व वनकर्मचारी यांनी सहभागात पार पडला. त्यांनतर वनपरिक्षेत्र बल्लारशाह पासुन नगर परिषद बल्लारशाह ते वाहतुक विपणन विभाग पर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅली च्या माध्यमातुन वन व वन्यजीव यांचे संरक्षण व संवर्धन करण्याचा संदेश देण्यात आला.

Previous Post Next Post