वरोरा येथील व्यक्तीने बल्लारशाह आलापल्ली मार्गावर झाडाला गळफास लाऊन केली आत्महत्या
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह
बल्लारशाह आल्लापल्ली मार्गावरील कळमना कोठारी रोड लगत झुडपातील एका झाडाला एक इसम फासी लावल्याचे रहदारी करणार्यांच्या लक्षात येता घटनेची माहीती बल्लारशाह पोलीसांना देण्यात आली,माहीती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अनिल चांदोरे हे आपल्या टीम सह घटना स्थळी दाखल झाले.
प्राप्त माहीती नुसार दि.२४ सप्टेंबर २०२१ ला बल्लारशाह पोलीस स्टेशन हदीतील बल्लारशाह आल्लापल्ली मार्गातील कळमना ते कोठारी मार्गावरील रस्त्यच्या कडेला असलेल्या झुडपांत एका झाडावर एक इसम फाशी लावुन आत्महत्या केल्याच लक्षात येताच रहदारी करणार्यांनी याची सुचना बल्लारशाह पोलीसांना दिली आत्महत्या करणार्या इसमाचे नाव संदीप बालाजी कोहळे वय ३८ वर्ष असुन सदर व्यक्ती वरोरा येथील रहीवासी असल्याच पोलीस उपनीरीक्षक अनिल चांदोरे यांनी माहीती दिली,
सदर घटना बल्लारशाह पोलीसांना कळताच पोलीस उपनिरीक्षक अनिल चांदोरे हे आपल्या सहकार्यांसह कळमना कोठारी मार्गावर घटना स्थळी पोहचले घटनास्थळी पोहचुन पंचनामा करून शवविच्छेदना करीता ग्रामीण रुग्नालय बल्लारशाह येथे पाठवीण्यात आले.
घटनेचा तपास बल्लारशाह पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल चांदोरे करीत आहेत.

